मुंबई : ‘फोर्ब्स’ने मंगळवारी जगात सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्रींची यादी जाहीर केली. ही यादी १ जून २०१६ ते १ जून २०१७ या काळात टीव्ही अभिनेत्रींनी कमावलेल्या उत्पन्नानुसार ही यादी करण्यात आली आहे. या यादीत बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आठव्या स्थानी आहे. तिचे उत्पन्न आहे ६५ कोटी.
प्रियांकाने २०१६ मध्ये ‘क्वांटिको’ ही अमेरिकन मालिका केली आणि तिच्याच जोरावर तिने ‘फोर्ब्स’च्या यादीत स्थान पटकावले आहे. २०१७ मध्ये तिने ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या सिझनसोबत ‘बेवॉच’ या हॉलिवूड चित्रपटात देखील काम केले. २०१६ मध्ये प्रियांकाने ११ मिलियन डॉलर इतकी कमाई केली.
त्याचबरोबर ती काही उत्पादनांची ब्रॅण्ड अॅम्बेसेडरदेखील आहे. उत्पन्नात सातत्य राखणारी अभिनेत्री म्हणून ‘फोर्ब्स’ने या भारतीय अभिनेत्रीचा उल्लेख केला आहे.