'हे' बॉलिवूड स्टार्स भारतात मतदान करु शकत नाही

अधिकृतरित्या भारतातले असूनही भारताचे नागरिक नाही आहेत.

Updated: Apr 18, 2019, 01:20 PM IST
 'हे' बॉलिवूड स्टार्स भारतात मतदान करु शकत नाही title=

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात लोकसभा निवडणूकीचे वातावरण आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. मतदानासाठी देशभरात जनजागृती करण्यात येत आहे. यात बॉलिवूड स्टार्सही जनतेला मतदान करण्यासाठी आवाहन करताना दिसत आहेत. परंतु या बॉलिवूड स्टार्सपैकी असे काही कलाकार आहेत जे स्वत: भारतात मतदान करु शकत नाही. असे काही स्टार कलाकार आहेत जे अधिकृतरित्या भारतातले असूनही भारताचे नागरिक नाही आहेत. त्यामुळे ते निवडणूकीत मतदान करु शकत नाही.

बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार हा देशभक्तीपर चित्रपट करण्यात माहीर आहे. अलीकडच्या काळात तर अक्षयने देशभक्ती शिकविणारे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. मात्र हाच अक्षय जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राबविणाऱ्या भारतात मतदान करू शकेल की नाही यावरच आता प्रश्नचिन्ह आहे. अक्षय कुमारचा जन्म पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला आहे. परंतु अधिकृतपणे तो भारताचा नागरिक नाही. अक्षय कुमारकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे. त्यामुळे अक्षय मतदान करु शकत नाही.

आलिया भट्टची आई सोनी राजदान या ब्रिटीश नागरिक आहेत. शिवाय आलियाकडेही ब्रिटीश पासपोर्ट आहे. आलिया अलीकडे राझी, गली बॉय, कलंक अशा चित्रपटांमुळे बॉलिवूडची स्टार अभिनेत्री झाली आहे. आलियाचा देशभरात मोठा चाहतावर्ग निर्माण होतो आहे. मात्र आलिया भारतातील निवडणुकीत मतदान करु शकत नसल्याचा खुसाला तिने केला होता.

बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील यंदाच्या निवडणुकीत मतदान करणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे.  दीपिकाचा जन्म हा डेन्मार्कच्या Cpenhagen मध्ये झाला आहे. तिच्याकडे Danish पासपोर्ट असल्याचे सांगितले जात आहे. 

बॉलिवूड गाजविणारी आणखी एक स्टार म्हणजे कतरीना कैफ. कतरिनाकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे. कतरीनाचे वडिल काश्मिरी आहेत आणि तिचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला आहे. त्यामुळे कतरिना यंदाच्या निवडणुकीत कुठे मतदान करते ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अलीकडे चित्रपट गाजविणाऱ्या टॉपच्या अभिनेत्रींमधील जॅकलिन फर्नांडिस हे एक नाव. जॅकलिनचा जन्म हा बहरिनच्या मॅनमामध्ये झाला आहे. तिचे वडिल श्रीलंकेचे तर आई मलेशियाची नागिरक आहे. 2006 मध्ये जॅकलिनने मिस युनिव्हर्स श्रीलंका स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.