गोव्यात मराठी, कोकणी चित्रपट दाखवण्यासाठी सक्ती - मुख्यमंत्री

गोव्यातल्या चित्रपटगृहांमध्ये  मराठी आणि कोकणी चित्रपट दाखवण्यासाठी सक्ती केली जाईल आणि प्रादेशिक चित्रपटांना प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले. 

Updated: Jun 17, 2017, 09:17 AM IST
गोव्यात मराठी, कोकणी चित्रपट दाखवण्यासाठी सक्ती - मुख्यमंत्री title=

पणजी : गोव्यातल्या चित्रपटगृहांमध्ये  मराठी आणि कोकणी चित्रपट दाखवण्यासाठी सक्ती केली जाईल आणि प्रादेशिक चित्रपटांना प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले. 

दहाव्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्धाटन केल्यानंतर पर्रिकर यांनी ही ग्वाही दिलीय. पर्रिकर यांच्याहस्ते अभिनेते सचिन पिळगावकर यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

उद्धाटन सोहळ्याला कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावड़े, शिवसेना खासदार संजय राऊत, बॉलीवुड अभिनेत्री दिव्या दत्ता, सचिन खेडेकर, प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, गजेंद्र अहिरे, मृण्मयी देशपांडे, वर्षा उसगावकर  हे कलाकार यावेळी उपस्थित होते. 

उद्धाटन सोहळ्यात भाऊ कदम, श्रेया बुगड़े आणि कुशल बद्रीके यांचा धमाकेदार कार्यक्रम झाला. या सोहळ्यात गोदरेजतर्फे सई ताम्हणकर हिला मराठी चित्रपटसृष्टीतील फ्रेश चेहरा हा पुरस्कार देऊन गौरवले.