कंडोम जाहिरातीवर बोलली रिचा चढ्ढा

कंडोम जाहिराती रात्री १० नंतर दाखवल्या जाव्यात असे अॅडव्हरटायझिंग स्टॅण्डर्स काऊन्सिल ऑफ इंडियाने सांगितले. यावर अनेकांकडून विरोध तर काहींकडून दुजोरा दर्शवण्यात आला. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 15, 2017, 08:25 PM IST
कंडोम जाहिरातीवर बोलली रिचा चढ्ढा  title=

मुंबई : कंडोम जाहिराती रात्री १० नंतर दाखवल्या जाव्यात असे अॅडव्हरटायझिंग स्टॅण्डर्स काऊन्सिल ऑफ इंडियाने सांगितले. यावर अनेकांकडून विरोध तर काहींकडून दुजोरा दर्शवण्यात आला. 

मात्र हा  एएससीआयचा हा निर्णय अभिनेत्री रिचा चढ्ढा हिला फारसा पसंत आला नसावा असेच दिसत आहे. ‘फुकरे’मध्ये भोली पंजाबनची भूमिका साकारणाऱ्या रिचाचा एक व्हिडीओ इंटरनेटवर समोर आला आहे. द क्वीण्ट या यू-ट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या १ मिनिट ३३ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये रिचा सांगत आहे की, ‘आपण जगात लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहोत, तर आपल्यापुढे म्हणजेच पहिल्या क्रमांकावर चीन आहे. मग तुम्हीच सांगा आपल्याला चीनच्या पुढे जायचे आहे की नाही?’

व्हिडीओमध्ये रिचा तिच्या ‘फुकरे’ या चित्रपटातील चूचा या पात्राचा उल्लेख करताना म्हणते की, जर चूचासारखे ५० हजार लोक रस्त्यावर फिरत असतील तर काय बिघडले? त्यांचा सांभाळ करायला त्यांचे आई-वडील आहेत ना. पुढे बोलताना रिचा म्हणतेय की, तुम्ही कधी मेडिकल स्टोअरवर एखाद्या मुलाला कंडोम खरेदी करताना बघितले काय? सॅनिटरी पॅड खरेदी करणाºया मुलीपेक्षाही कंडोम खरेदी करणारा धास्तावलेला असतो. ही भीती आणि मनातील अस्वस्थता दूर करण्यासाठीच ही जाहिरात बंद करण्यात आली आहे. एकूणच दीड मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये भोली पंजाबन कंडोमच्या जाहिरातीवर आणलेल्या बॅनवर काहीशी तिखट प्रतिक्रिया देताना दिसून आली.