मुंबई : संपूर्ण जग आपल्या विरोधात असेल तेव्हा फक्त आणि फक्त शेवटपर्यंत सोबत राहते ती म्हणजे आई.. सध्या अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे NCBच्या ताब्यात आहे. आर्यनसह 8 जणांना एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. रेव्ह पार्टीत एनसीबीने केलेल्या छापेमारीनंतर रोज याप्रकरणी नवीन खुलासे समोर येत आहेत. शिवाय आर्यन कोठडीत कसं आयुष्य जगत आहे, हे देखील वारंवार समोर येत आहे. मुलाला अडचणीत पाहाता गौरी आर्यनला त्याच्या आवडीचा पदार्थ घेवून पोहोचली.
गौरी आर्यनसाठी बर्गर घेवून पोहोचली. तेव्हा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यनला बर्गर देण्यास नकार दिला. दरम्यान आर्यनच्या ड्रग्स कनेक्शनमुळे किंग खान अर्थातचं शाहरुख खान वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या शाहरुखसाठी ही वाईट वेळ आहे. पण शाहरुखच्या वाईट काळात त्याचे चाहते, मित्र परिवार आणि कुटुंब कायम त्याच्यासोबत असल्याचं दिसून येत आहे.
चौकशीत वडिलांबाबत आर्यनने केला मोठा खुलासा
'माझे वडील शाहरुख खान खूप व्यस्त असतात. सध्या ते एकाचवेळी 3 चित्रपटांचं शूटिंग करत आहेत. ते इतके व्यस्त आहेत की, त्यांना भेटण्यासाठी तुम्हाला त्यांच्या असिस्टंट पूजाची अपॉईंटमेंट घ्यावी लागेल. आर्यनने एनसीबीला असंही सांगितलंय की, त्याने परदेशातून चित्रपट निर्मितीचा कोर्स केला आहे.