अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुखचा गाऊन, यालाच म्हणतात, 'नाकापेक्षा मोती जड'

अभिनेत्री आणि त्यांचा वजनदार घागरा.. अनेकदा आपल्या वजनापेक्षा अधिक वजनाचा घागरा परिधान करणा-या या 

Updated: Dec 24, 2020, 10:56 PM IST
अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुखचा गाऊन, यालाच म्हणतात, 'नाकापेक्षा मोती जड' title=

मुंबई : अभिनेत्री आणि त्यांचा वजनदार घागरा.. अनेकदा आपल्या वजनापेक्षा अधिक वजनाचा घागरा परिधान करणा-या या अभिनेत्रींचा घागरा सांभाळायला खास माणसं ठेवावी लागतात.. असंच काहीसं घडलंय अभिनेत्री जेनेलिया डिसूझा- देशमुखच्या बाबतीत.. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री जेनेलिया डिसूझा- देशमुख हिच्या डिझायनर गाऊनची चर्चा रंगली आहे. जेनेलियाने परिधान केलेला गाऊन सांभाळण्यासाठी तिला चक्क टीमची मदत घ्यावी लागली. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.

या व्हिडीओमध्ये जेनेलिया ख्रिसमसच्या एका शूटसाठी तयार झाली असून तिने मोठा घेर असलेला पांढऱ्या रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला आहे. मात्र, हा गाऊन मोठा असल्यामुळे तिला चालताना टीमची मदत घ्यावी लागली. तुझे मेरी कसम या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी जेनेलिया लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.