Genelia D'souza : स्केटिंग शिकणाऱ्या जेनेलियासोबत झालं असं काही... पाहा व्हीडिओ

जेनेलियाच्या हाताला फ्रॅक्चर...'पावरी' स्टाईल व्हीडिओ व्हायरल 

Updated: Mar 9, 2021, 03:35 PM IST
Genelia D'souza : स्केटिंग शिकणाऱ्या जेनेलियासोबत झालं असं काही... पाहा व्हीडिओ

मुंबई : अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुख (Genelia D'souza) गेल्या काही वर्षांपासून जरी सिनेसृष्टीपासून थोडं अंतर ठेऊनच असली, तरी सोशल मीडियावर मात्र ती कायमच अक्टीव्ह राहिलेली आहे. कालपासून जेनेलियाने शेअर केलेला एक व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

जेनेलिया डिसूझा गेल्या काही दिवसांपासून स्केटिंग शिकतेय, मात्र त्याचं प्रशिक्षण घेताना जेनेलिया पडली आणि तिच्या हाताला फ्रॅक्चरही झालंय. मात्र असं असलं तरी तिने एक व्हीडिओ तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून पोस्ट केलाय, जो गेल्या काही दिवसांपासून ट्रेंडमध्ये असलेल्या ‘पावरी’ (Pawri Ho Rahi Hai) स्टाईल आहे.

जेनेलिया म्हणते... ये मैं हूं, ये हमारी स्केटिंग है....और ये हमारी रिकव्हरी हो रहीं है.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

 

या व्हीडिओ जरी मजेशीर असला तरी या व्हीडिओखाली जेनेलियाने महत्वपूर्ण संदेश दिला आहे. जेनेलियाचं म्हणणं आहे की झेप घेताना कधीतरी ठेच पोहोचतेच, मात्र त्यात हार न मानता प्रयत्न करतच राहिलं पाहिजे. जेनेलियाला विश्वास आहे की जरी आता तिच्या हाताला दुखापत झाली असली, तरी ती बरी झाल्यावर पुन्हा स्केटिंग नक्कीच शिकेल.