‘गजनी’ फेम अभिनेत्री पतीपासून घेतेय घटस्फोट? पाहा Asin ची पहिली प्रतिक्रिया

Asin Thottumkal on Divorce : असिन थोट्टूमकल ही 'गजनी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून असिनला ओळख मिळाली पण सोशल मीडियावरून तिनं फोटो आणि व्हिडीओ डिलीट केल्यानं त्यानंतर तिच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 28, 2023, 11:33 AM IST
‘गजनी’ फेम अभिनेत्री पतीपासून घेतेय घटस्फोट? पाहा Asin ची पहिली प्रतिक्रिया title=
(Photo Credit : Social Media)

Asin Thottumkal on Divorce : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि 'गजनी' फेम असिन थोट्टूमकल ही तिच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखली जाते. गजनी चित्रपटानंतर असिन थोट्टूमकलच्या लोकप्रियतेत वाढ झाली. त्यानंतर काही वर्षे चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर लग्न बंधनात अडकलेल्या असिन थोट्टूमकलनं लग्नानंतर तिचं करिअर सोडतं तिच्या संसारात लक्ष दिलं. त्याचबरोबर तिच्या मुलीसोबत वेळ व्यथित केला. असिननं मायक्रोमॅक्स फाऊंडर राहुल शर्माशी लग्न केले. पण आता असिननं सोशल मीडियावर केलेल्या एका बदलामुळे तिच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यानंतर आता असिननं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

असिन ही चित्रपटसृष्टीतून लांब असली तरी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. अशात असिन तिचा पती राहुल शर्मा आणि मुलगी अरीन सोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असिननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या लग्नाचे सगळे फोटो डिलीट केले आहेत. त्यामुळे असिन आणि तिचा पती राहुलमध्ये सगळं ठीक नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नक्की त्यांच्यात काय बिनसलं हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या सगळ्या चर्चा सुरु असताना असिननं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले आहे. असिन यावेळी म्हणाली की "आम्ही सध्या उन्हाळी सुट्टीचा आनंद घेत आहोत. एकमेकांच्या शेजारी बसून आम्ही नाश्ता करत आहोत. अशात आम्ही काही चुकीच्या बातम्या पाहिल्या. हे पाहून आम्हाला ती वेळ आठवली जेव्हा आम्ही आमच्या कुटुंबासोबत बसून आमच्या लग्नाची तयारी करत होतो आणि दुसरीकडे आमचा ब्रेकअप झाल्याची बातमी समोर येत होती. खरंच, थोडं चांगलं काम करा. माझ्या एवढ्या चांगल्या सुट्टीतील पाच मिनिटी व्यर्थ गेल्यानं थोडी निराशा आहे पण त्याशिवाय सुट्टीचा खूप आनंद घेत आहे. तुमच्या सगळ्यांना आजचा दिवस खूप चांगला जावो."

ghajini fame Asin Thottumkal on Divorce says please do better

दरम्यान, असिनच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर तिनं आणि राहुलनं 2016 मध्ये राहुल शर्माशी लग्न केलं. असिन नेहमीच तिच्या लग्नाचे आणि पतीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करायची. पण अचानक तिनं सोशल मीडियावरून ते फोटो डिलिट केल्यानं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. तर असिनची आता तिच्या इन्स्टाग्रामवर असलेली शेवटची पोस्ट ही 24 ऑक्टोबर 2022 ची आहे. यावेळी तिनं शेअर केलेले हे फोटो तिची लेक अरिनच्या वाढदिवसातील आहेत.