'मेरे रश्के कमर' गाण्यावरील 'या' मुलीचा डान्स तुम्ही पाहिला का?

आजकाल इंटरनेटमुळे आपले कौशल्य, गुणवत्ता लोकांपर्यंत पोहचवणं काहीसं सोपं झालं आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 7, 2017, 10:13 AM IST
'मेरे रश्के कमर' गाण्यावरील 'या' मुलीचा डान्स तुम्ही पाहिला का? title=

नवी दिल्ली : आजकाल इंटरनेटमुळे आपले कौशल्य, गुणवत्ता लोकांपर्यंत पोहचवणं काहीसं सोपं झालं आहे.

सोशल मीडियाची महत्त्वाची भुमिका 

सोशल मीडिया यात महत्त्वाची भुमिका बजावत आहे. फेसबुक, युट्यूबवर आपल्या कलेचा व्हिडिओ अपलोड करुन तुम्ही लोकांपर्यंत पोहचू शकता, त्यांची दाद मिळवू शकता.

डान्स व्हिडिओ व्हायरल

आजकाल सोशल मीडियावर आपण असे अनेक व्हिडिओज बघतो. असाच एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक मुलगी 'मेरे रश्के कमर' या गाण्यावर नृत्य सादर करत आहे. तिचा सुंदर डान्स आणि दिलखेचक अदा लोकांना भावल्या. तिला त्याबद्दल भरभरून दाद मिळाली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडिओतील मुली अद्यापही काही माहिती मिळाली नाही.