Good News : कुणी तरी येणार, येणार गं...! रितेश-जिनिलिया पुन्हा होणार आई-बाबा

जिनिलियाने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

Updated: Oct 29, 2022, 05:47 PM IST
Good News : कुणी तरी येणार, येणार गं...! रितेश-जिनिलिया पुन्हा होणार आई-बाबा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची जोडी ही लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. रितेश आणि जिनिलिया हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. लवकरच हे दोघं ‘मिस्टर मम्मी’ (Mister Mummy) या त्यांच्या आगामी चित्रपटात पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

याविषयी रितेशनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया गरोदर असल्याचं दाखवण्यात येणार आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला डॉक्टर चेकअप करताना दिसत आहे. तर चित्रपटात डॉक्टरची भूमिका ही महेश मांजरेकर करत आहेत. चेकअपनंतर रितेशला कळलं की तो प्रेग्नंट आहे. दरम्यान, यावेळी फक्त रितेश नाही तर जिनिलियाही प्रेग्नंट असते. हा मजेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. (Good News Riteish Deshmukh And Genelia Deshmukh Going To Be Parents Mister Mummy Trailer Released) 

रितेश आणि जिनिलिया हे त्यांच्या ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटातून जिनिलिया आणि रितेश तब्बल 10 वर्षांनी एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून जिनिलिया बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शाद अली यांनी केलं आहे. भूषण कुमार आणि हेक्टिक सिनेमा प्रायव्हेट लिमिटेड या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

दरम्यान, रितेश आणि जिनिलिया यांचा ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटाशिवाय 'वेड' हा मराठी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून रितेश दिग्दर्शणात पदार्पण करणार आहे.  तर जिनिलिया मराठी चित्रपटात अभिनय करणार आहे.