सुव्रत साकारणार 'फुलवाला'

'कधीही अनुभव न घेतलेल्या विश्वातल्या भूमिका मला करायला आवडतात.'

Updated: Dec 9, 2019, 07:36 PM IST
सुव्रत साकारणार 'फुलवाला'

मुंबई : 'दिल दोस्ती दुनियादारी' मलिकेच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेला अभिनेता  सुव्रत जोशी आता फुलवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहे. शंतनू गणेश रोडे  दिग्दर्शन करत असलेल्या "गोष्ट एका पैठणीची''या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आहे. चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

सायलीसह सुव्रत जोशीचीही अतिशय वेगळी आणि महत्त्वाची भूमिका आहे. भोर इथं या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. आतापर्यंत विविध चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. 

'माझ्या रोजच्या जगण्यापेक्षा काहीतरी वेगळं असलेल्या, मी कधीही अनुभव न घेतलेल्या विश्वातल्या भूमिका मला करायला आवडतात. कारण अभिनेता म्हणून त्यात आव्हान असतं. या  चित्रपटातील फुलवाल्याची भूमिकाही तशीच असल्याचं सुव्रतने सांगितलं आहे.

'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेने चाहत्यांचे प्रचंड मनोरंजन केले. परंतु या मालिकेचा दुसरा भाग 'दिल दोस्ती दोबारा' मात्र चाहत्यांचे मनोरंजन करण्यात अयशस्वी ठरला. परंतु मालिकेतील कलाकारांनी आणि त्यांच्या मैत्रीने चाहत्यांच्या मनात घर केले.