व्हिडिओ : बिग बींची नात नव्या नवेलीचे ग्लॅमरस फोटोशूट

गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये स्टार किड्सची एंट्री होत आहे. 

Updated: Aug 21, 2018, 01:48 PM IST
व्हिडिओ : बिग बींची नात नव्या नवेलीचे ग्लॅमरस फोटोशूट title=

मुंबई : गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये स्टार किड्सची एंट्री होत आहे. अलिकडेच श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरचा धडक सिनेमा प्रदर्शित झाला. तर सैफ अली खानची मुलगी सारा अली खानचे दोन सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. शाहरुख खानची मुलगी सुहाना बॉलिवूड डेब्यूच्या तयारीत आहे. यातच अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली चर्चेत आली आहे.

अलिकडेच नव्या नवेली नंदाचा फोटोशूट व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत नव्या आपली आई श्वेता नंदासोबत फोटोशूट करताना दिसत आहे. नव्याचा हा अंदाज तरुणाईला भावणार आहे. २१ वर्षीय नव्याने MXS नाव्याच्या क्लोथिंग ब्रॅंडसाठी फोटोशूट केले. 

 

MxS F/ W 2018 Shweta Bachchan Nanda and Navya Naveli Nanda for MxS SBN in our “Chevron midi dress" NNN in our “Blush mini dress" F A S H I O N J U S T G O T F A N C I E R MUA @rosbelmonte Photographer @rohanshrestha #MxS #MonishaxShweta

A post shared by MXS (@mxsworld) on

नव्याचा हा अंदाज सुरेख आणि लक्षवेधी ठरत आहे. फोटोशूटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. श्वेता नंदाने फोटोशूटचा बिहाईंड-द-सीन हा व्हिडिओ शेअर केला.

व्हिडिओत आई-मुलीची ही जोडी जबरदस्त दिसत आहे. नव्या अनेकदा तिच्या फोटोजमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालते.

या फोटोशूटसाठी नव्याला चांगलेच मानधन मिळाले आहे.