Childhood Photos : 'हे' स्टारकिड्स आहेत बॉलिवूडचे दिग्गज कलाकार, तुम्ही ओळखलंत का?

Famous Bollywood Actor Childhood Photos :  फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेता ओळखायचा आहे. 

Updated: Dec 9, 2022, 01:00 PM IST
Childhood Photos : 'हे' स्टारकिड्स आहेत बॉलिवूडचे दिग्गज कलाकार, तुम्ही ओळखलंत का? title=

Famous Bollywood Actor Childhood Photos : 'सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेता ओळखायचा आहे. 

फोटोत काय?

फोटोमध्ये तीन मुले दिसत आहेत. या फोटोत बहीण मध्यभागी बसली आहे, तर मोठा भाऊ बहिणीकडे पाहत आहे, तर लहान भाऊ फोन धरत आहे. तिन्ही मुलं खूप गोंडस दिसत आहेत. त्यांचा हा क्यूट फोटो चाहत्यांची मनं जिंकत आहे. ही तिन्ही मुले बॉलिवूडच्या शो मॅनची मुले आहेत. त्यांचे कुटुंब खूप मोठे आहे आणि प्रत्येक पिढीतून चित्रपटांमध्ये त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी आहे. त्यांच्या कुटुंबाने बॉलिवूडला खूप काही दिले आहे.

ओळखलंत का?

तुम्ही या स्टारकिड्सना आत्तापर्यंत ओळखले नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, ही राज कपूर यांची मुले आहेत, ज्यांना बॉलिवूडचा शो मॅन म्हटले जाते.फोटोतील सर्वात लहान ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि त्यांची मोठी बहीण रितू नंदा आहेत. फोटोत तिघेही खूप क्यूट दिसत आहेत. दोन्ही मुले मोठी होऊन बॉलिवूडचे मोठे कलाकार बनले आहेत. 

दरम्यान हा फोटो पाहून अनेकांना या स्टारकिड्सना ओळखता आले नाही. कारण हे स्टार्सना बहूतेक युवा पिढींना क्वचित माहिती आहेत. दरम्यान या स्टारकिडसचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडतोय.