Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा लोकप्रिय असून सध्या तो त्याचा ‘जोगिरा सा रा रा रा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डिप्रेशन म्हणजेच नैराश्याला शहरात राहणाऱ्या लोकांचा आजार म्हणाला होता. त्यानं सांगितलं होतं की गावातील लोकांना डिप्रेशन सारख्या गोष्टी होत नाहीत. नवाजुद्दीननं केलेल्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्याला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. आता नवाजुद्दीनच्या या वक्तव्यावर दुसऱ्या एका कलाकारानं कमेंट केली आहे. नवाजुद्दीनच्या या वक्तव्यावर 'दहाड' फेम अभिनेता गुलशन देवैया या कलाकारनं कमेंट करत नवाजुद्दीनला ट्रोल केलं आहे. त्यावेळी गुलशन म्हणाला, हा, त्याला तर 'धृतराष्ट्र किंवा गांधारी सिंड्रोम' झाला असेल. त्यानं केलेल्या या वक्तव्यानंतर मी त्याला गंभीरतेनं घेत नाही असं गुलशन म्हणाला आहे.
गुलशननं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून नवाजुद्दीनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नवाजुद्दीनं डिप्रेशनविषयी बोलताना दिसत आहे. तर हा व्हिडीओ शेअर करत गुलशन म्हणाला, धृतराष्ट्र आणि गांधारी सिंड्रोम आहे. मी त्याच्या कलेचा सन्मान करतो पण मी आता त्याला गंभीरतेनं घेणार नाही. जर तुम्ही मद्यपान आणि नशा करणाऱ्या लोकांना पाहिलत तर हे सगळे मुद्दे गावातील लोकांना देखील लागू होतात. खरंतर नशा करणं हा देखील एक मानसिक आजार आहे. कोणीही नशेत यासाठी डुबत नाही की त्याला ते आवडतं किंवा त्यावर प्रेम आहे. पण हे सगळं त्या समस्यांचे कारण आहे ज्यातून ते बाहेर पडू शकत नाही.
हेही वाचा : पुरुषासारखा आवाज असावा म्हणून Karan Johar नं....; त्याच्या खासगी आयुष्याबाबतचा सर्वात मोठा खुलासा
नवाजुद्दीननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला होता. त्यानं ही मुलाखत ‘एनडीटीव्ही’ला दिली होती. यावेळी नवाजुद्दीन म्हणाला, 'ग्रामीण भागात नैराश्याचा आजार नाही. ग्रामीण भागात नैराश्य आणि मानसिक आरोग्य असं काही नसतं. अशा समस्या ही शहरी संकल्पना आहे. एवढंच नाही, तर जर गावात त्याने सांगितलं की, तो नैराश्येत आहे तर त्याला गावातील लोक मारतील आणि म्हणतील की जेवण कर, शेतात काम आणि शांत झोपं. त्यामुळे मी असं म्हणेण की असं काही नसतं. हे सगळं शहरांच्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त पाहायला मिळत आणि ते त्यांच्या भावनांमध्ये वाहून जातता.
Dritharashtra & Gandhari syndrome. I immensely respect the man for his craft but I’d not take him seriously on this issue.
If you even just look at alcoholism or addictions, they exist in rural communities and that’s mental illness. No addict indulges in addiction because they… https://t.co/msnc9FJW2o— (@gulshandevaiah) May 24, 2023
नवाजुद्दीनच्या या वक्तव्यावर अनेकांनी नकार दर्शवला आहे. अनेकांनी नाराजी व्यक्त करत डिप्रेशन ही खूप मोठी आणि भयानक गोष्ट असल्याचे म्हटले आहे.