Nawazuddin Siddiqui's Haddi Trailer : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून 'हड्डी' या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन हा तृतीयपंथीच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री सुष्मिता सेननंतर आता नवाजुद्दीन तृतीयपंथीच्या भूमिकेत आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. त्याच्या या चित्रपटाचं नाव 'हड्डी' असं आहे. पण जसं आपण सुष्मिता सेनच्या ताली या वेब सीरिजमध्ये पाहिलं की त्यात तृतीयपंथी यांच्या अधिकारांसाठी सुष्मिता लढते. तर दुसरीकडे नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'हड्डी' या चित्रपटात सुड घेताना दिसणार आहे. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
2.25 मिनिटांच्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन सुरुवातीला बोलताना दिसत की लोक आम्हाला का घाबरतात हे माहित आहे? आमचा आशीर्वाद खूप शक्तिशाली असतो आणि आमचा श्राप हा भयानक. त्यानंतर या ट्रेलरमध्ये एका नंतर एकाचा खून होताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी दिग्दर्शक अनुराग कश्यप देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. ट्रेलरमध्ये आपण पाहू शकतो की नवाजुद्दीन हा सुरुवातीला एका पोलिस अधिकाऱ्याचा खून करतो, लहाणपणी त्याची लिचिंग झाली होती. लोकांनी त्याला मारहाण केली आणि गळ्यात फास लावून त्याला झाडावर लटकवले होते. पण त्याच्या गळ्यात हड्डी नाही, त्यामुळे त्याचा फास सरकला असं त्यात सांगण्यात आले आहे. त्यामुळे नवाजुद्दीच्या भूमिकेच नाव हे 'हड्डी' असं आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन फक्त एका तृतीयपंथीच्या भूमिकेत नाही तर सीरिअल किलरच्या भूमिकेत दिसणार आहे.
मुलगा म्हणून जन्माला आलेला हड्डी मोठा होऊन कसा तृतीयपंथी झाला त्याचा प्रवास पाहायला मिळतो. याविषयी बोलताना हड्डी म्हणतो की मी आतून मुलगी होतो, आहे आणि नेहमीच असेल. पण यासोबत त्याचा एक सीरिअल किलर होण्याचा प्रवासही पाहायला मिळाला आहे. कोणाकडून कशा प्रकारे सुढ घेतो हे पाहयला मिळते. तर हा चित्रपट 7 सप्टेंबर रोोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तुम्ही Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.
हेही वाचा : सखीला खूप त्रास देतो; जावई सुव्रत जोशीविषयी शुभांगी यांचा मोठा खुलासा
'हड्डी' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. अनुराग कश्यप यांच्या भूमिकेचे नाव प्रमोद अहवालत असे आहे. या दोघांची या चित्रपटात जीशान अय्यूब, ईला अरुण, सौरभ सचदेव, राजेश कुमार, श्रीधर दुबे आणि सहर्ष शुक्ला यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.