Hardeek - Akshaya: राणादा- पाठकबाईंचा जीव कायमस्वरुपी एकमेकांत रंगला...पाहा लग्नातील पहिले फोटो

Hardeek Joshi and Akshaya Deodhar Wedding : राणादा- पाठकबाईंच्या लग्नाचे फोटो आले समोर, सोशल मीडियावर चाहत्यांनी दिल्या खास शुभेच्छा

Updated: Dec 2, 2022, 12:54 PM IST
Hardeek - Akshaya: राणादा- पाठकबाईंचा जीव कायमस्वरुपी एकमेकांत रंगला...पाहा लग्नातील पहिले फोटो

Akshaya Deodhar and Hardeek Joshi Wedding : छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील राणादा आणि पाठकबाई यांची भूमिका साकारलेला अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) हे दोघेही सतत चर्चेत आहेत. चाहते त्यांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. दरम्यान, आता त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. हार्दिक आणि अक्षयानं आज 2 डिसेंबर रोजी सप्तपदी घेतल्या आहेत. 

हार्दिक आणि अक्षया यांचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला. मित्रपरिवार, कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत हार्दिक आणि अक्षयाने सप्तपदी घेत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. पारंपरिक पद्धतीनं त्यांचा विवाह सोहळा पार पला आहे. विवाहबंधनात अडकून हार्दिक आणि अक्षयानं नवीन आयुष्याला सुरुवात केली. लग्नासाठी अक्षयाने लाल रंगाची नऊवारी पैठणी साडी नेसली आहे. पारंपरिक लूक केला होता. अक्षयानं गळत्या ठुशी, काळ्या मण्यांनी भरलेलं मंगळसुत्र, हिरव्या बांगड्या, मोत्याची नथ असा अक्षयाचा लूक आहे. तर हार्दिकनं क्रिम रंगाचा कुर्ता आणि लाल रंगाचं धोतर नेसलं आहे. 

पाहा अक्षया आणि हार्दिकच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ -

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Hardeek Joshi and Akshaya Deodhar Wedding : पाठकबाईंच्या मेहंदीचे फोटो आले समोर

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक त्यांच्या लग्नाच्या बातमीची प्रतिक्षा करत होते. हार्दिक आणि अक्षयाच्या लग्नाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर कमेंट करत त्या दोघांना खूप शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, हार्दिकनं त्यांच्या लग्नातील काही फोटो आणि व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्याचे फोटो पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. दरम्यान, या आधी हार्दिक आणि अक्षयानं त्यांच्या केळवणपासून मेहंदी, संगीत आणि हळदीचे अनेक फोटो शेअर केले होते.