'लग्न झालेल्या पुरूषाच्या प्रेमात पडलेल्या महिलेला पाहिलं का?' अशा प्रश्नावर रेखा म्हणाल्या...

झगमगत्या दुनियेत सर्वात जास्त चर्चेचा विषय असतो, तो म्हणजे कलाकारांचे प्रेम प्रकरण 

Updated: Apr 4, 2021, 03:17 PM IST
'लग्न झालेल्या पुरूषाच्या प्रेमात पडलेल्या महिलेला पाहिलं का?' अशा प्रश्नावर रेखा म्हणाल्या... title=

मुंबई : झगमगत्या दुनियेत सर्वात जास्त चर्चेचा विषय असतो, तो म्हणजे कलाकारांचे प्रेम प्रकरण. आज देखील बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा आणि महानायक अनिताभ बच्चन यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगत असतात. रेखा इंडियन आयडल 12च्या सेटवर प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या . तेव्हा स्पर्धकांनी त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी रेखा यांनी देखील मनसोक्त आनंद लुटला. शिवाय त्यांनी मंचावर उतरून मज्जा केली. सर्व स्पर्धकांच्या मनात रेखा यांच्या बद्दल उस्तुकता होती. 

कार्यक्रम रंगत असताना होस्ट जय भानुशालीने एक प्रश्न विचारला. 'रेखाजी, नेहू तुम्ही कधी प्रेमात अगदी वेडी झालेली महिला पाहिली आहे. ते सुद्धा लग्न झालेल्या पुरूषाच्या?' यावर रेखा म्हणाल्या 'मला विचारा..' सुरूवातीला त्यांचं हे उत्तर जयच्या लक्षात आलं नाही. पण नंतर जय म्हणाला 'बाण अगदी निशाण्यावर लागला आहे..'

सेटवर घडलेल्या या विनोदी अंदाजाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये गायक नेहा कक्कर आणि विशाल ददलाणीला देखील हासू आवरलं नसल्याचं दिसत आहे.  पाहा व्हीडिओ...

रेखा आणि महानायक अमिताभ बच्चन यांचं नातं काय होतं हे प्रत्येकाला माहित आहे. आजही त्यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगत असतात. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्यामुळे जया आणि अमिताभ यांच्या नात्यात कटू पणा आला होता.