Salman Khanच्या करियरला कलाटणी देण्यामागे प्रभू देवांचा मोलाचा वाटा

बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेसृष्टी पर्यंत नावलैकिक मिळवणारे कोरियोग्राफर म्हणजे प्रभू देवा.

Updated: Apr 4, 2021, 01:42 PM IST
Salman Khanच्या करियरला कलाटणी देण्यामागे प्रभू देवांचा मोलाचा वाटा title=

मुंबई : बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेसृष्टी पर्यंत नावलैकिक मिळवणारे कोरियोग्राफर म्हणजे प्रभू देवा. आज त्यांचा वाढदिवस आहे. तर त्यांच्या वाढदिवसांचं औचित्य साधत त्यांच्या बद्दल काही खास गोष्टी जाणून घेवू. आज अभिनेता सलमान खानला कोण ओळखत नाही? सलमानच्या आगामी सिनेमाबद्दल कायम चाहत्यांच्या मनात उत्सुकता असते. सलमानच्या वाट्याला आज जे काही आहे, त्यामध्ये प्रभू देवा यांचा  खारीचा वाटा आहे.  2009 साली प्रदर्शित झालेल्या 'वॉन्टेड' सिनेमाच्या माध्यमातून प्रभू देवा यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

'वॉन्टेड' सिनेमानंतर सलमानच्या चाहत्यांच्या संख्येत भलतीच वाढ झाली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर राज केलं. या सिनेमानंतर सलमानच्या करिअरला चांगलीचं कलाटणी  मिळाली. सिनेमाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली. तर सलमानसोबत मुख्य भुमिकेत आयशा टाकिया झळकली. सिनेमाच्या गाण्यांना तर चाहत्यांनी तुफान डोक्यावर घेतलं. 

प्रभू देवा यांच्या  खसगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर,  विवाहित असताना देखील ते अभिनेत्री नयनताराच्या प्रेमात होते. प्रभू देवा फक्त विवाहित नव्हते तर त्यांना तीन मुलं देखील आहेत. कुटुंबअसून देखील नयनतारा आणि प्रभू देवा लिव्हइनमध्ये होते. नयनतारासाठी प्रभू यांनी स्वतःचा धर्म देखील बदलला.