गालावर खळी.....! दीपिकाच्या फोटोवर रणवीरची अशी कमेंट की.....

दीपिकाने रणवीरलाही अक्षरश: तिच्या प्रेमाचं वेड लावलं आहे असं म्हणायला हरकत नाही. 

Updated: Jun 25, 2019, 09:16 AM IST
गालावर खळी.....! दीपिकाच्या फोटोवर रणवीरची अशी कमेंट की.....  title=

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. अनेकदा याचा प्रत्ययही आला आहे. कलाविश्वात आपल्या अनोख्या स्मितहास्याने आणि सौंदर्याने अनेकांनाच भुरळ पाडणाऱ्या दीपिकाने रणवीरलाही अक्षरश: तिच्या प्रेमाचं वेड लावलं आहे असं म्हणायला हरकत नाही. 

बॉलिवूडमध्ये रणवीर आणि दीपिका ही एक अशी जोडी आहे, ज्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी गाजली तितकीच ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे. प्रेमप्रकरण आणि मग विवाहबंधनात अडकल्यानंतर त्यांची जोडी तर, विशेष लक्षवेधी ठरत आहे. एखाद्या चित्रपटाचा सेट म्हणू नका किंवा मग एखादा कार्यक्रम, रणवीर आणि दीपिका एकत्र आले की बस्स.... चाहत्यांच्याही काळजाचा ठोका चुकतो. 

एक पती आणि एक मित्र म्हणून रणवीर नेहमीच दीपिकाची साथ देताना आजवर पाहायला मिळालं आहे. मुख्य म्हणजे तो तिची स्तुती करण्याची एकही संधी गमावत नाही. सध्या याचं सुंदर उदाहरण पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

इन्स्टाग्रामवर दीपिकाने तिचे काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये पांढऱ्या आणि चंदेरी रंगाच्या डिझायनर वेअरमध्ये दिसत आहे. यातिलच एका फोटोमध्ये दीपिकाच्या हास्यावरही सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. जे पाहता खुद्द रणवीरही तिची प्रशंसा करण्यापासून स्वत:ला रोखू शकलेला नाही. 

तिच्या फोटोंवर त्याने अशा काही कमेंट केल्या आहेत की, नेटकऱ्यांचं लक्षही या जोडीच्या अफलातून केमिस्ट्रीने वेधलं आहे. 

 

'सिंधी बहू...', म्हणत रणवीरने दीपिकाच्या सौंदर्याची प्रशंसा केली, तर आणखी एका कमेंटमध्ये त्याने तिच्या गालांवर पडणाऱ्या खळीने आपलं मन जिंकल्याची कबुली दिली. दीपिकाचा हा अंदाज चाहत्यांनाच नव्हे, तर तिच्या पतीलाही खऱ्या अर्थाने घायाळ करुन गेला.