बाई, बुब्स आणि ब्रा… अभिनेत्री हेमांगी कवीचं सडेतोड मत

'मी घरात, बाहेर अंर्तवस्त्र घालायचं की नाही हा माझा प्रश्न'

Updated: Jul 13, 2021, 11:29 AM IST
बाई, बुब्स आणि ब्रा… अभिनेत्री हेमांगी कवीचं सडेतोड मत

मुंबई : अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावरून कायमच आपलं बोल्ड मत बिनधास्त पोस्ट करत असते. यावेळी हेमांगीने यावेळी आपल्या फेसबुक पोस्टवर “बाई, बुब्स आणि ब्रा” या चार चौघात न बोलल्या जाणाऱ्या विषयावर भाष्य केलं आहे.  (Hemangi Kavi shares views in a facebook post on women, bra) “ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, ज्या कम्फर्टेबल आहेत, त्यांनी ती जरुर घालावी, मिरवावी, काहीही! त्यांची निवड! पण ज्यांना नाहीच आवडत त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने का बघितलं जावं! किंवा हे का लादलं जावं?” अशा आशयाची पोस्ट केली आहे. 

या व्हिडीओवरून सुरू झाली चर्चा 

हेमांगी कवीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर “गोल पोळ्याचं गुपित!” असं कॅप्शन देत एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंटनंतर हेमांगीने तिच्या इन्स्टास्टोरीवर एक पोस्ट शेअर केलीय. यात हेमांगी कवीने कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. ती म्हणाली, “हो मला स्तन आहेत. त्याला स्तनाग्रेही आहेत अगदी पुरुषांसारखी! जसे चालताना माझे हातपाय हलतात तसचे काम करताना माझे स्तन हलतात. कारण मी सस्तन प्राणी आहे. मादी आहे! ज्यांचे हलत नाहीत अशांना माझा त्रिवार सलाम. आता मी घरात, बाहेर, सोशल मीडियावर अंर्तवस्त्र (ब्रा) घालायची कि नाही ही माझी पंसत आहे.”

हेमांगी कवीची 'ही' पोस्ट चर्चेत 

हेमांगी कवीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हेमांगीने तिच्या इन्स्ट स्टोरीच्या पोस्टमध्ये म्हणाली आहे की, “मला डायरेक्ट मेसेज करून माझ्या विषय काळजी दाखवणाऱ्या हितचिंतकांनो..चिल… या एवढ्या चिंधी गोष्टीवरुन मला अनफॉलो करावसं वाटतं असेल तर खुशार करावं. विचित्र विचारांचे फॉलोअर्स नसलेलं कधीही चांगल” असं ती म्हणाली. ट्रोल करणाऱ्यांला सडेतोड उत्तर देण्याची हेमांगीची ही पहिली वेळ नाही या आधी देखील हेमांगीने अनेकदा ट्रोलर्सची बोलती बंद केली.