Hera Pheri 3 चित्रपटात आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री?

Hera Pheri 3 चित्रपटातील स्टार कास्ट म्हणजेच अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांचा सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोवर कमेंट करत उत्सुक असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 

Updated: Feb 26, 2023, 04:11 PM IST
Hera Pheri 3 चित्रपटात आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री?  title=

Hera Pheri : 'हेरा फेरी' (Hera Pheri) चित्रपटाचे चाहते ज्या गोष्टीची गेले आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो क्षण आलाच आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फ्रँचायझी 'हेरा फेरी'चा तिसरा भाग 'हेरा फेरी 3' (Hera Pheri 3) च्या चित्रीकरणाला अखेर सुरुवात झाल्याची बातमी नुकतीच समोर आलीये. महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात नवीन चेहरा दिसणार नसून जुनी स्टारकास्ट म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar), सुनील शेट्टी (Sunil Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) 'हेरा फेरी 3' चित्रपटात दिसणार आहेत. परंतु या स्टारकास्ट सोबत अजून एका कलाकाराची एन्ट्री होणार असल्याची चर्चा सुरु आहे. खरंतर या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत संजय दत्त (Sanjay Dutt)  दिसणार आहे.

'हेरा फेरी 3' मध्ये संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत?

'बॉलिवूड हंगामा' च्या रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला 'हेरा फेरी 3' या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटातील संजय दत्तची भूमिका खूपच विनोदी असल्याचे सांगण्यात येतंय. त्याचबरोबर संजय दत्तची (Sanjay Dutt) भूमिका अंध आणि काहीशी विचित्र असेल, त्याचसोबत संजय दत्तनंदेखील हा चित्रपट करण्यासाठी होकार दिला असल्याचे म्हटले जाते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Hera Pheri 3 मागोमाग आता Welcome 3 खळखळून हसवाणार; मजनू भाईला तुम्ही भेटणार ना?

'हेरा फेरी 3'चे शूटिंग सुरू झाले? 

काही दिवसापूर्वीच अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. यावेळी चित्रपटाच्या प्रोमो शूटचा एक फोटो देखील व्हायरल झाला होता. 'हेरा फेरी' च्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन हे प्रियदर्शन यांनी केले होते. तर दुसरत्या भागाचे अनीस बज्मी यांनी केले होते, मात्र तिसऱ्या भागाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी फरहाद सामजी यांच्याकडे देण्यात आली आहे. या आधी अक्षय कुमारच्या जागी जॉन अब्राहम (John Abraham) आणि कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) दिसणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, चाहत्यांचा विरोधानंतर 'हेरा फेरी 3' या चित्रपटात अक्षय कुमार पुन्हा एकदा दिसणार आहे, मात्र अक्षय कुमारसाठी चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत, असे म्हटले जात आहे.