तोंडावर Mask लावून सकाळ- सकाळी Shopping ला निघाली अभिनेत्री; तिला कोणी ओळखूच शकलं नाही...

इतकं सगळं सुरु असताना त्या अभिनेत्रीला कुणीही ओळखू शकलं नाही.   

Updated: Sep 15, 2022, 02:48 PM IST
तोंडावर Mask लावून सकाळ- सकाळी Shopping ला निघाली अभिनेत्री; तिला कोणी ओळखूच शकलं नाही...
hiding face Bollywood Actress Priyanka Chopra went to shop with husband nick jonas

मुंबई : सेलिब्रिटी मंडळी एकदा का प्रसिद्धीझोतात आले, की त्यांच्या सर्वसामान्य राहणीमानात काही बदल होतात. त्यातच सेलिब्रिटी जरा जास्तच प्रसिद्ध असेल तर सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जाण्यायेण्यावरही असंख्य बंधनं येतात. पण, सततची गर्दी, सततची कॅमेरांची नजर या साऱ्याला ही मंडळीसुद्धा कंटाळतात. शेवटी, त्यांच्याकडूनच अशी काही शक्कल लढवली जाते की विचारून सोय नाही. (Celebrity Video)

एका अशाच आघाडीच्या अभिनेत्रीनं शक्कल लढवत कमालच केली. पतीसोबत ही अभिनेत्री सकाळच्या वेळी एका दुकानात गेली. तिथं या अभिनेत्रीनं स्वत:चेच फोटो असणारे प्रोडक्ट्स पाहून तिथं सेल्फीही काढला. यावेळी तिच्या पतीनं उत्साहात त्या प्रोडक्टकडे इशारा करत इतरांचं लक्ष वेधलं. पण, इतकं सगळं सुरु असताना त्या अभिनेत्रीला कुणीही ओळखू शकलं नाही. 

फक्त हिंदीच नव्हे, तर हॉलिवूड (Hollywood) चित्रपटांमध्येही दमदार अभिनय करणारी ही अभिनेत्री दुकानात येते काय आणि जाते काय... ही कमाल करणारी अभिनेत्री आहे प्रियांका चोप्रा. 

Priyanka chopra नं इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये निकसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिनं चेहऱ्यावर मास्क लावल्याचं दिसत आहे. बहुधा मास्क असल्यामुळं प्रियांकाला कोणीच ओळखू शकलेलं नाही. आहे की नाही, सार्वजनिक ठिकाणी मनसोक्त वावरण्यासाठीची ही निंजा टेक्निक? 

प्रियांका आणि निक सध्या मुलीच्या संगोपनात रमले आहेत... 
2018 मध्ये विवाहबंधनात अडकलेले प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (Priyanka Chopra Nick jonas) सध्या त्यांच्या मुलीच्या संगोपनाला जास्त वेळ देत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रियांका आणि निकनं सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीचं पालकत्वं स्वीकारलं. सध्या ते दोघंही मुलीला जास्तीत जास्त वेळ देताना दिसत आहेत.