Ex Wife चे Private क्षण अभिनेत्याच्या कॅमेरात कैद; फोटोंवरून नजरच हटेना

एक काळ असाही होता, जेव्हा या नात्यानं सर्वांच्या नजरा वळवल्या होत्या

Updated: Jun 6, 2022, 12:07 PM IST
Ex Wife चे Private क्षण अभिनेत्याच्या कॅमेरात कैद; फोटोंवरून नजरच हटेना  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही सेलिब्रिटी जोड्या त्यांच्या नात्यापेक्षा हे नातं जगासमोर आणण्याच्या पद्धतींमुळे चर्चेत असतात. अशाच जोड्यांपैकी एका जोडीनं प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, कपल गोल्सही दिले. पण, एका वळणावर आल्यानंतर मात्र त्यांच्या या नात्यात दुरावा आला. 

दुरावा नेमका का होता, यामागे तशी बरीच कारणं. पण, आज आपण त्यांच्यातील दुराव्यापेक्षा त्यांच्या नात्याची चांगली बाजू पाहणार आहोत. ही बाजू तेव्हाची, जेव्हा या जोडीच्या प्रेमानं जग जिंकलं होतं. 

ही जोडी म्हणजे अभिनेता ब्रॅड पीट आणि त्याची Ex Wife अभिनेत्री अँजेलिना जोली. हॉलिवूडच्या दुनियेत ब्रॅड आणि अँजेलिना विशेष गाजले ते त्यांच्या नात्यामुळे. आता त्यांच्यात दुरावा असला तरीही एक काळ असाही होता, जेव्हा या नात्यानं सर्वांच्या नजरा वळवल्या होत्या. (hollywood Actro Brad Pitt clicks intimate black and white portraits of then wife Angelina Jolie)

काही वर्षांपूर्वी ब्रॅडनं एका मासिकासाठी त्याची तेव्हाची पत्नी असणाऱ्या अँजेलिनाचे काही फोटो टीपले होते. काही फोटोंमध्ये जोलीसोबत तिची मुलं होती, तर काहींमध्ये तिच्याच मादक सौंदर्याची जादू पाहायला मिळाली होती. 

कृष्णधवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट प्रकारातील या फोटोंमध्ये दिसणारी प्रत्येक गोष्ट किंबहुना अँजेलिनाचं सौंदर्य किती बारकाईनं पाहिलं गेलंय याची लगेचच अनुभूती होते. अभिनेत्रीचे विविध Mood या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहेत. 

कायमच कॅमेरासमोर असणाऱ्या ब्रॅडनं त्यावेळी कॅमेराच्या मागे येत पत्नीचे टीपलेले हे खास क्षण तेव्हाही चर्चेत होते आणि आताही त्यांची तितकीच चर्चा होते असं म्हणायला हरकत नाही.