हत्येच्या धमकीनंतर Salman Khan ला पोलिसांकडून सुरक्षा कवच

Salman Khan च्या अडचणीत वाढ... अभिनेत्याच्या घरी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त   

Updated: Jun 6, 2022, 11:50 AM IST
 हत्येच्या धमकीनंतर Salman Khan ला पोलिसांकडून सुरक्षा कवच title=

मुंबई : ख्यातनाम सिने अभिनेता सलमान खानला हत्येची धमकी देण्यात आलीय... सिद्धू मूसेवालाप्रमाणं हत्या करण्याची धमकी या पत्रात देण्यात आली... सलमानचे वडील सलीम खान वांद्रे बँडस्टँडवर जॉगिंगला गेले होते... ते बेंचवर बसले असताना, कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं त्यांना हे धमकीचं पत्र दिलं. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चौकशी सुरू केलीय. 

अभिनेत्याच्या घरी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. अलिकडेच पंजाबमध्ये सिद्धू मूसेवाला या गायकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सलमान खानलाही तसंच ठार मारण्याची धमकी देण्यात आलीय.

नक्की काय झालं? 
सलमानचे वडील सलीम खान सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे त्यांना बेंचवर सलमानच्या नावे असलेलं धमकीचं पत्र मिळालं. या पत्रात सलमानला सिद्धू मुसेवालाप्रमाणे मारण्यात येणार असल्याचं म्हटलंय. सलीम खान यांना सकाळी साडे सात ते आठच्या दरम्यान हे पत्र मिळाल्याचं समजतंय.

गुन्हा दाखल, चौकशी सुरु
या धमकीनंतर वांद्रे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात कलम 506 (2) भादविनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणात अधिक चौकशी करत आहेत.

मुसेवाला हत्याकांडनंतर सुरक्षेत वाढ
काही दिवसांपूर्वी पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला यांची अज्ञातांनी गोळी झाडून हत्या केली होती. या हत्याकांडानंतर सलमानच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.