डब्बेवाल्यांसोबत साजरा झाला "होम मिनिस्टर" महिला दिन विशेष भाग.

होम मिनिस्टरचा अनोखा कार्यक्रम. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Mar 6, 2018, 08:44 AM IST
डब्बेवाल्यांसोबत साजरा झाला "होम मिनिस्टर" महिला दिन विशेष भाग.

मुंबई : होम मिनिस्टरचा अनोखा कार्यक्रम. 

आदेश बांदेकर होम मिनिस्टर टीम ला घेऊन थेट पोहोचले ते कर्जतच्या मोंटेरिओ रिसॉर्ट मध्ये. कारण होते महिला दिन विशेष भागाचे, या विशेष भागात सहभागी झाले होते डब्बेवाले आणि त्यांच्या होम मिनिस्टर. 

महिला दिन विशेष भाग 

जे डब्बेवाले आपली भूक भागवतात त्यांना मनाचा मुजरा म्हणून त्यांच्या होम मिनिस्टर बरोबर ह्या खास भागाचा आयोजन करण्यात आलं होतं, आणि आदेश भावोजींनी सुद्धा त्यांना ट्रीट देत त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेतला.
याच खास भागात एक वाहिनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, गेल्या २५ वर्षामध्ये आम्ही कधी फिरायला हि बाहेर पडू शकलो नाही पण “आदेश भावोजी आणि झी मराठीने” आम्हाला हि संधी दिली त्याबद्दल खूप धन्यवाद.

हा महिला दिन विशेष भाग तुम्हाला पाहता येणार आहे गुरुवार ८ मार्च २०१८ संध्या. ६.३० वा. फक्त झी मराठीवर.