बोल्ड सीन देऊनही 'या' 10 सौंदर्यवती बॉलिवूडमध्ये होऊ शकल्या नाहीत यशस्वी, पाहा फोटो

यातील काही सौंदर्यवतींना काही चित्रपट मिळाले पण तरीही त्यांना हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही, ज्यामुळे ते हळूहळू या चंदेरी दुनियेपासून लांब जाऊ लागले.

Updated: May 30, 2022, 08:18 PM IST
बोल्ड सीन देऊनही 'या' 10 सौंदर्यवती बॉलिवूडमध्ये होऊ शकल्या नाहीत यशस्वी, पाहा फोटो title=

मुंबई : बॉलिवूडमधील एकापेक्षा एक अभिनेत्री तुम्ही पाहिल्या असतील. परंतु सगळ्यांनाच बॉलिवूडमध्ये संधी मिळतेच, असे नाही आणि ज्यांना संधी मिळते, त्यांना त्या संधीचा फायदा उचलता येत नाही. बॉलिवूडमध्ये अशा ही काही अभिनेत्री आहेत. ज्यांनी आपल्या बोल्ड लूक दाखवून काम करण्याचा आणि करिअर करण्याचा प्रयत्न केला. परंतु तरी देखील त्याचा काहीही फायदा झाला नाही.

यातील काही सौंदर्यवतींना काही चित्रपट मिळाले पण तरीही त्यांना हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही, ज्यामुळे ते हळूहळू या चंदेरी दुनियेपासून लांब जाऊ लागले. या अभिनेत्रींपैकी काहीजण आज आपल्या कौटुंबिक जीवनात परतले आहेत. या यादीत मल्लिका शेरावत, उदिता गोस्वामी, तनुश्री दत्ता आणि शर्लिन चोप्रा यांसारख्या अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे.

चला तर या सौंदर्यवतींबद्दल जाणून घेऊया संपूर्ण माहिती

मल्लिका शेरावत

मल्लिका शेरावत

मल्लिका शेरावतला ख्वाहिश या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर मर्डर या चित्रपटानंतर तिला सर्वच लोक ओळखू लागले, मात्र आणखी काही चित्रपट केल्यानंतर ती बॉलिवूडमधून जवळजवळ गायब झाली. तिला त्यानंतर काही सिनेमे मिळाले परंतु तिला मोठे आणि पावरफुल रोल मिळाले नाही आणि आज तिचे नाव बॉलिवूडमधून गायब झाले आहे.

उदिता गोस्वामी

उदिता गोस्वामी

जहर आणि अक्सर सारख्या चित्रपटात तुम्ही उदिताला पाहिलं असेल. तसेच हिमेश रेशमियाचे झलक दिखलाजा हे गाणे कोणालाही विसरता येणार नाही. अशा म्यूजिक व्हिडीओमध्ये तिने काम केलं. तिने तिच्या मादक अदांनी सर्वांनाच वेड लावलं होतं, मात्र यानंतर काही निवडक चित्रपटांनंतर आज ती कुठेच दिसत नाही.

कोईना मित्रा

कोइना मित्रा

साकी साकी या गाण्यावर थिरकणारी अभिनेत्री कोएना मित्रा हिने आपल्या मनमोहक शैलीने प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पण तीही आता बॉलीवूडमधूम बेपत्ता आहेत. ती शेवटी बिग बॉस 13 मध्ये दिसली होती.

गीता बसरा

गीता बसरा

गीता बसराने क्रिकेटर हरभजन सिंगसोबत लग्न केले आहे. पण त्याआधी तिने द ट्रेन सारख्या चित्रपटात बोल्ड स्टाईल दाखवली आहे. मात्र सध्या ती चित्रपटांपासून दूर आहे.

शर्लिन चोप्रा

शर्लिन चोपड़ा

शर्लिन चोप्रा टाईमपास आणि रेड स्वस्तिक सारख्या चित्रपटात झळकली होती. तिने बॉलिवूडसाठी एकापेक्षा एक बोल्ड सिन दिले. पण तरीही निर्मात्यांनी तिला काम देणे बंद केले.

सेलिना जेटली

सेलीना जेटली

सेलिना जेटलीला तुम्ही जनशीन या चित्रपटात पाहिलं असेल. त्यावेळी तिचा बोल्ड लूक लोकांना खूप आवडला होता. तिला त्यानंतर गोलमाल सारख्या हिट चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, पण तरी तिला आपली जादू चालवता आली नाही. ज्यानंतर हळूहळू तिला काम मिळणं बंद झाले.

नेहा धुपिया

नेहा धूपिया

नेहा धुपियाने तिच्या बोल्ड स्टाईलने चित्रपटांमध्ये प्रवेश केला होता, मात्र त्यानंतर ती आता मोजक्याच सिनेमांमध्ये दिसत आहे. ए थर्सडे या चित्रपटात पाहिले गेले आहे. सध्या नेहा रिएलिटी शोचा भाग आहे. परंतु ती बॉलीवूडपासून लांबच रहाते.

मेघना नायडू

मेघना नायडू

कालीयो का चमन या गाण्यात मेघनाला कहर करताना तुम्ही पाहिले असेलच. यानंतर तिने हवस नावाच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पणही केले, पण ती नंतर बॉलीवूडमधून गायब झाली आहे.

समीरा रेड्डी

समीरा रेड्डी

मुसाफिर या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या चित्रपटांपासून दूर आहे आणि ती आपल्या कुटुंब आणि मुलांमध्ये व्यस्त आहे. परंतु असे असले तरी तिने एकेकाळी आपल्या बोल्ड अदांनी बॉलिवूड गाजवलं होतं.

तनुश्री दत्ता

तनूश्री दत्ता

तनुश्री दत्ताला 'आशिक बनाया आपने' या गाण्यातून प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातील गाण्यांनी तर धुमाकूळ घातला होता. मात्र, यानंतर तनुश्रीला फारसे काम मिळाले नाही आणि ती अमेरिकेला निघून गेली.