खळखळून हसवणारा 'हाऊसफुल ४'चा ट्रेलर प्रदर्शित

भन्नाट विनोदी कथा असलेल्या ट्रेलरला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.

Updated: Sep 27, 2019, 04:54 PM IST
खळखळून हसवणारा 'हाऊसफुल ४'चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार स्टारर बहुप्रतिक्षीत 'हाऊसफुल ४' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. भन्नाट विनोदी कथा असलेल्या ट्रेलरला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. खिलाडी कुमारने स्वत:च्या सोशल आकाउंटच्या माध्यमातून चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. 'हाऊसफुल ४'चा ट्रेलर पाहून चाहत्यांच्या मनात चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २६ ऑक्टोबर रोजी हा विनोदी चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

 

सहाशे वर्षांपूर्वीचा इतिहास, कलाकारांचे डबल रोल, अफलातून कॉमेडी इत्यादी मजेदार गोष्टींभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसत आहे. त्याचप्रमाणे चित्रपटात उडालेला गोंधळ पोटधरून हसण्यास भाग पाडत आहे. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांच्या आनंदात भर घालताना दिसत आहे.    

‘हाऊसफुल’ या फ्रँचाइजीमधला ‘हाऊसफुल ४’ हा चौथा चित्रपट आहे. अक्षय शिवाय चित्रपटात रितेश देशमुख, क्रिती सनॉन, बॉबी देओल, पूजा हेगडे आणि क्रिती खरबंदा अशी कलाकारांची एकत्र मेजवाणी चाहत्यांना अनुभवता येणार आहे.