आई आणि पत्नीमध्ये कपिलचं होतयं सँडविच, कसं आहे सासू-सुनेचं नातं?

कहानी घर घर की... पाहा सासू- सुनेमध्ये काय झालीये कपिलची अवस्था  

Updated: Mar 26, 2022, 11:08 AM IST
आई आणि पत्नीमध्ये कपिलचं होतयं सँडविच, कसं आहे सासू-सुनेचं नातं? title=

मुंबई : 'माझी सासू अशी... माझी सून अशी....' सासू-सुनेचं नातं प्रत्येकाला ठाऊक आहे. प्रत्येक घरात सासू-सुन हा विषय फार गंभीर असतो. सासू-सुनेच्या भांडणात मुलांचं मात्र सँडविच होतं. ही कहानी घर घर की... फक्त सर्वसामान्यांच्या घरची नाही, तर सेलिब्रिटींच्या आयुष्यात देखील हा वाद असतोचं. विनोदवीर कपिल शर्माच्या आयुष्यात देखील अशी गोष्ट घडत असेल का, ज्यामुळे कपिलचं सँडविच होत असेल. खुद्द कपिलच्या आईने कपिलच्या पत्नीसोबत असलेलं नातं कसं आहे, सांगितलं आहे. 

शो दरम्यान कपिल म्हणाला, 'माझी आई कधी स्वयंपाक करत नाही. माझी आई वांग्याचं भरीत आणि साग फार छान बनवते... पण लग्ना आधी....' यावर कपिलच्या आई म्हणतात, 'स्वयंपाक घरात कोणती वस्तू कोठे आहे मला माहिती नाही...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे त्या म्हणतात, 'माझी सून फार चांगली आहे. मी नशीबवान आहे, की मला अशी सून भेटली.' यावेळी त्यांनी कपिलचं देखील कौतुक केलं. त्या म्हणाल्या, 'माझा मुलगा देखील फार चांगला आहे....'

दरम्यान, कपिलच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, कपिल आणि गिन्नी सोबत डिसेंबर 2018 साली लग्न केलं. गिन्नी आणि कपिलला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. कपिल त्याच्या कुटुंबाचे फोटो कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असतो....