मुंबई : वीस वर्ष जुन्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपुर कोर्टाने आज सलमान खानला दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात सलमान खानला 6 वर्षाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. या प्रकरणातील सह दोषी असलेल्या 5 कलाकारांची निर्दोष सुटका केली आहे. सलमान खानच्या चाहत्यांना ही सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आहे.
रिपोर्टनुसार, सलमान खान आणि त्याचं कुटूंब जोधपुरच्या ताज हॉटेलमध्ये 11 नंबरच्या रूममध्ये राहिले होते. निकालापूर्वीच्या रात्री सलमान खान कुटुंबासोबत संपूर्ण रात्र जागा होता. हॉटेलच्या स्विमिंग पूल शेजारी सलमान खानच कुटूंब बसून होतं. अलविरा, अर्पिता आणि त्यांची मुले देखील होते. रात्री 12 वाजता सलमान खान जिमला गेला. त्यानंतर रात्री 1 वाजता सलमान खान परत आला आणि तो स्विमिंगच्या शेजारी बराच वेळ बसून होता. रात्रभर कुटुंब अशाच पद्धतीने स्विमिंगपूल शेजारी बसून होता. त्यानंतर संपूर्ण कुटूंब 3 ते 4 वाजेपर्यंत आपल्या खोलीत गेले.
काय आहे प्रकरण
जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरविण्यात आले आहे. अन्य कलाकार निर्दोष मुक्तता करण्यात आलेय. काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान याला जोधपूरमधील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. मात्र, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान या निर्दोष ठरविण्यात आलेय. आता काय शिक्षा होणार याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.
वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. १- २ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांची सलमानने शिकार केली होती.
निकालाच्यावेळी सलमान याच्यासह सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे उपस्थित होते. या प्रकरणात सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.