पँटच्या उघड्या बटणमुळं ट्रोल झाली हृतिकची गर्लफ्रेंड सबा; व्हिडीओ होतोय व्हायरल

हृतिक आणि सबा सोशल मीडियावर दोघंही खूप सक्रिय असतात. अनेकदा दोघंही एकमेंकासोबतचे फोटो शेअर करत असतात. अद्याप या दोघांनीही त्यांचं नात अधिकृतपणे जाहिर केलेलं नसलं तरी लवकरच ते त्यांच्या नात्याची घोषणा करतील याकडे चाहत्यांच लक्ष आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे सबा ट्रोलिंगची शिकार होतेय.

Updated: Aug 18, 2023, 07:25 PM IST
पँटच्या उघड्या बटणमुळं ट्रोल झाली हृतिकची गर्लफ्रेंड सबा; व्हिडीओ होतोय व्हायरल title=

मुंबई :बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या आणि अभिनेत्री सबा आझादच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. दोघांना बऱ्याचवेळा एकत्र स्पॉट करण्यात येते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकताच हृतिक आणि सबाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी सबाला ट्रोल केलं आहे तर अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओची स्तुती केली आहे. दरम्यान, आता सबा आणि हृतिक वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे.  आणि या चर्चेचं कारण म्हणजे सबाचा ऊप्स मोमेंट आहे.

विरल भयानी यांनी त्यांच्या इंन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत एका चाहत्याने लिहीलं की, मुलगी पँटचं बटण लावायला विसरली, तिच्या वडिलांना दिसत नाही का? तर अजून एकाने कमेंट करत लिहीलं की, तर अजून एकाने म्हटलंय की, मॅडमच्या पँन्टचं बटण उघड आहे. अशा अनेक प्रकारच्या कमेंटही सोशल मीडियावर येत आहेत. याचबरोबर अनेकांनी तिच्या या व्हिडीओचं कौतुकही केलं आहे. सोशल मीडियावर सबाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. मध्यंतरी हृतिकपेक्षा सबा आझाद  फार लहान दिसते म्हणून सबा अनेकदा ट्रोलही झाली आहे. याचबरोबर या दोघांच्या लग्नाच्या चर्चाही अनेकदा सुरु असल्याचं आपण पाहिलं आहे. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासामुळेही खूप चर्चेत असतो. सध्या हा अभिनेता सिंगर सबा आझादला डेट करत आहे. दोघांनीही चाहत्यांसमोर त्यांचं नात स्वीकारालं नसेलही पण त्यांच्या नात्याची झलक अनेकदा आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर दोघंही खूप सक्रिय असतात. अनेकदा दोघंही एकमेंकासोबतचे फोटो शेअर करत असतात. अद्याप या दोघांनीही त्यांचं नात अधिकृतपणे जाहिर केलेलं नसलं तरी लवकरच ते त्यांच्या नात्याची घोषणा करतील याकडे चाहत्यांच लक्ष आहे.

दरम्यान, हृतिक रोशनच्या कामाविषयी बोलायचं झालं तर लवकरच तो  फाइटर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं दीपिका आणि हृतिक पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सगळ्यात शेवटी हृतिक सैफ अली खानसोबत विक्रम वेधा या चित्रपटात दिसला होता.