झी मराठीचा सुट्टी विशेषांक 'खाली डोकं वर पाय'ला मोठा प्रतिसाद

खाली डोकं वर पाय विशेषांकाला वाचकांचा मोठा प्रतिसाद

Updated: May 16, 2019, 03:21 PM IST
झी मराठीचा सुट्टी विशेषांक 'खाली डोकं वर पाय'ला मोठा प्रतिसाद

मुंबई : झी मराठीचा उन्हाळी सुट्टी विशेषांक 'खाली डोकं वर पाय'ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जवळपास १ लाख विशेषांक विकले गेले आहेत. उन्हाळ्यांच्या सुट्टींमध्ये लहान मुलांसाठी हा विशेषांक नक्कीच वेगळा अनुभव देणारा ठरला आहे. आतापर्यंत अनेकांनी यावर सकारात्म प्रतिसाद देत विशेषांकाचं कौतूक केलं आहे.

गंमतीशीर कोडे, मनोरंजन आणि वेगवेगळ्या गोष्टी यामुळे बच्चे कंपनीची उन्हाळी सुट्टी नक्कीच मजेत जाणार आहे. पालकांना देखील या अंकाबाबत समाधान व्यक्त केलं आहे. या अंकाची मोठ्य़ा प्रमाणात मागणी वाढली आहे. ११ मे पासून हा अंक सर्वत्र उपलब्ध झाला आहे. घरपोच डिलिव्हरीसाठी टोल फ्री नंबर 8888 300 300 किंवा http://www.bookganga.com भेट देऊ शकता.

<