अमिताभ बच्चन यांच्यामुळे जेनेलियासोबत लग्न होवू शकलं ; रितेशचा मोठा खुलासा

बिग बींमुळे रितेश आणि जेनेलियाच्या नव्या आयुष्याला झाली सुरूवात

Updated: Oct 9, 2021, 09:05 AM IST
अमिताभ बच्चन यांच्यामुळे जेनेलियासोबत लग्न होवू शकलं ; रितेशचा मोठा खुलासा

मुंबई : अभिनेता रितेश देखमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक आहेत. जेनेलिया आणि रितेश सतत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. आता दोघे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कोन बनेगा करोडपती या शोमध्ये उपस्थित राहणार आहेत. प्रश्न-उत्तरांच्या या खेळात दोघे त्यांच्या आयुष्यातील खास क्षण देखील शेअर करणार आहेत. यावेळी रितेशने त्याच्या आणि  जेनेलियाच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. 

एपिसोड दरम्यान, या जोडप्याने इंडस्ट्रीतील त्यांचे अनुभवही शेअर केले. जेनेलियाने अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या तिच्या पहिल्या जाहिरातीबद्दल विशेष सांगितले. बिग बींना आठवते की त्यांनी एकत्र जाहिरातीसाठी कसे शूट केले. बिग बींनी जेनेलियाच्या क्लोज-अप शॉटची विनंती केली.

त्यानंतर रितेशने त्याच्या लग्नाचे श्रेय बिग बींना दिले आणि म्हणाले, 'तेव्हा जर तुम्ही क्लोज-अप शॉट दिला नसता तर आमचं लग्न झालं नसतं. त्या क्लोज-अप शॉटमुळे मी आणि जेनेलियाने पहिला चित्रपट एकत्र करण्याचा निर्णय घेतला. आज जे काही आहे ते फक्त आणि फक्त त्या दिवसामुळे आहे.' 

यावेळी रितेशने जेनेलियाला प्रपोझ देखील केला. रितेश-जेनेलिया हे 2012 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. 'तुझे मेरी कसम' आणि 'तेरे नाल लव हो गया' या दोन सिनेमांत हे जोडपं एकत्र दिसलं होतं. त्यानां दोन मुलं आहेत.