Katrina Kaif Relations With Alia Bhatt And Deepika Padukone : बॉलिवूडमधील नातं ही विचित्र आहेत, इथे एकासोबत डेट आणि दुसऱ्या सोबत लग्न झालंय. तर अनेक वर्षांचे संसार विवाहबाह्य संबंधांसाठी तुटली आहेत. गंमत म्हणजे बॉलिवूडमधील दुनियासुद्धा गोल आहे. इथे कुठल्या ना कुठल्या कारणाने ही मंडळी कधी पार्टी किंवा कामानिमित्त एकमेकांच्या समोर येतात. बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि चॉकलेट बॉय रणबीर कपूरची लव्ह लाइफ पण अशीच इंटरेस्टिंग आहे.
रणबीरने आलिया भट्टसोबत लग्न केलं आणि आज त्यांना गोंडस मुलगी आहे. पण आलियाशी लग्न करण्यापूर्वी रणबीरच्या आयुष्यात कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण आली होती. आज करितना आणि दीपिकानेही आपल्या आयुष्यात पुढे गेल्या आहेत. कतरिनाने विकी कौशल आणि दीपिकाने रणवीर सिंगशी लग्न केलंय.
एकदा दीपिका आणि आलियाशी तिचं असलेल्या नात्याबद्दल कतरिना मनमोकळ्यापणाने बोलली. 2009 मध्ये दीपिका आणि रणबीर वेगळे झाले आणि त्यानंतर रणबीर-कतरिना 2016 पर्यंत एकमेकांना डेट करत होते.
मीडिया रिपोर्टनुसार रणबीरच्या कुटुंबाला कतरिना फारशी आवडत नव्हती, त्यामुळे या दोघांचा ब्रेकअप झाला. 2019 मध्ये एले इंडियाला दिलेल्या थ्रोबॅक मुलाखतीत कतरिना कैफला विचारण्यात आलं होतं की, ज्यावेळी आलिया रणबीरला डेट करत होती तेव्हा तिने आलियासोबत मैत्री कशी केली, एवढंच नाही तर तिचं दीपिकासोबत नातं कसं आहे?
या प्रश्नाला उत्तर देताना कतरिना म्हणाली की, या गोष्टींमुळे काही फरक पडत नाही, या जाणीवेतून हे घडतंय. स्वतःमध्ये राग कायम ठेवल्याने परिस्थितीत कोणताही बदल होत नाही. ते तर्कापुरते मर्यादित असतं. पण मी माणूस आहे. होय, मला वाईट वाटतं, मलाही रडायला येतं. मला उद्ध्वस्त झाल्यासराख वाटतं आणि मग, मी परत उठते आणि म्हणते, सर्वकाही ठीक आहे.
आणि आता विषय दीपिकासोबत असलेल्या अस्वस्थ नात्याबद्दल असेल तर आता मला आमच्यामध्ये कुठलंही वैर किंवा अस्वस्था वाटत नाही. मला त्याला जाऊ देण्यातच आनंद मिळाला.
तुम्हाला आठवत असेल 2018 मध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचं रिसेप्शन झालं. त्यावेळी कतरिना कैफनेही आली होती. याचा खुलासा करताना कतरिनाने बोलली होती, 'माझ्यासाठी एकच महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने येऊन मला आमंत्रित दिलं. मला ती नेहमीच आवडली आहे. तुम्हाला माहिती आहे, ती ज्याप्रकारे तिच्या कामात गेली अनेक वर्षे वावरत आणि कामाबद्दल तिचं प्रेम पाहून मला तिच्याबद्दल खूप आदर आहे.'
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.