'कोणासमोर झुकायचं, कोणासमोर नाही हेच जर कळलं नाही...' मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

रुचिरा जाधव सोशल मीडियावर रुचिराचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.  ही एक अशा अभिनेत्रींपैकी आहे जी फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करु लागली. नुकतीच  रुचिरा जाधवने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शिवजयंती निमीत्त शेअर केली आहे. 

Updated: Feb 19, 2024, 05:02 PM IST
'कोणासमोर झुकायचं, कोणासमोर नाही हेच जर कळलं नाही...' मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत  title=

मुंबई : आज संपुर्ण महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडत आहे. अनेक कलाकार या सोहळ्यानिमीत्त फोटो व्हिडीओ शेअर करत आहेत. प्रत्येक मराठी कलाकार आज शिव जयंती निमीत्ताने पोस्ट शेअर केली आहे. नुकतीच माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्री रुचिरा जाधवने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शिवजयंती निमीत्त शेअर केली आहे. 

ही पोस्ट शेअर करत रुचिराने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा,शिवजयंती च्या निमित्ताने एक आठवण share कराविशी वाटते. Big boss च्या घरात असताना दर आठवड्याला Entertainment day च्या दिवशी कोणी ना कोणी पाहुणे येत असत. असंच एका Friday ला एक प्रतिष्ठित व्यक्ती आली होती, जी स्वतः कलाकार होती तसेच राजकारणाशी सुद्धा संबंधित होती. कार्यक्रम झाल्यावर त्यांना आदराने see off करताना आमच्यापैकी एकाने कोणीतरी “ए चला, त्यांना मुजरा करूया” असं म्हटलं.मग काय, सगळ्यांनी वाकून मुजरा केला. मी मात्र तशीच उभी होते. मला विचारलं, तू का मुजरा केला नाहीस, मी म्हटलं, “मुजरा फक्त महाराजांना”! तत्व म्हणजे तत्व. दिखावा मला कधी जमला नाही आणि जमणार ही नाही आणि कोणासमोर झुकायचं, कोणासमोर नाही हेच जर कळलं नाही, तर काय शिकलो आपण महाराजांकडून. मुजरा राजे जय शिवराय. 

रुचिराची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी या पोस्टवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहिलं आहे की, जय भवानी जय शिवाजी
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर अजून एकाने लिहीलं आहे की, खंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त... सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर अजून एकाने लिहीलंय, शिवजयंतीच्या शिवमयं भगव्या शुभेच्छा. तर या पोस्टसोबत अभिनेत्रीने तिचे काही फोटोही शेअर केले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रुचिरा जाधव ही एक अशा अभिनेत्रींपैकी आहे जी फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करु लागली. सोशल मीडियावर रुचिराचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात अभिनेत्री रुचिरा जाधव अनोख्या अंदाजात दिसली होती. रुचिराची ही पोस्टवर सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या कॅप्शन व लूकचं कौतुक केलं जात आहे.