मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बरेच सेलिब्रिटी आयफा (IIFA) 2022 पुरस्कारांसाठी अबू धाबी इथं पोहोचत आहेत. अभिनेता सलमान खान हासुद्धा याच कालाकारांपैकी एक ज्यानं आयफाची वाट धरली. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानचा एक फोटो समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो IIFA च्या प्रेस मीटिंगसाठी जाताना दिसत आहे.
आता तुम्ही म्हणाल मिटिंगसाठी जातानाच्या व्हिडीओमध्ये इतकं खास ते काय? तर, हा व्हिडीओ पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल, तिथं नेमकं काय घडलं. (iifa 2022 singer honey singh stopped as he was not allowed to go with salman khan)
प्रेस मीटसाठी सलमान आणि त्याच्यासोबत आणखी एक कलाकार उभं असल्याचं पाहायला मिळतं. पण, तिथं असणाऱ्या सुरक्षा रक्षकांकडून सलमानला सर्वप्रथमआत जाण्यास प्राधान्य देण्यात येतं. तो दुसरा सेलिब्रिटी मात्र तिथेच उभं असल्याचं दिसतो.
हा सेलिब्रिटी म्हणजे रॅपर, गायक आणि संगीत दिग्दर्शक यो यो हनी सिंग. सलमानसोबतच आत जाण्यासाठी हनी सिंगनं प्रयत्न केला का, तर हो. पण, त्याला सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या मंडळींनी रोखलं.
त्याचवेळी सलमान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा मात्र आतमध्ये निघून गेले. हा व्हिडओ एका क्षणात व्हायरल झाला आणि सर्वजण हनी सिंगची जोरदार खिल्ली उडवू लागले.
दोन मिनिटं थांबला असता, तर अशी फजिती झाली नसती..., अरे देवा काय हा अपमान अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडीओ पाहिल्यानंतर दिल्या आहेत. हनी सिंगनं त्यावेळी नेमकं काय करायला हवं होतं? तुम्हाला काय वाटतं?