भाईजान, सल्लू, दबंग खान नंतर सलमान 'या' नवीन नावाने ओळखला जाणार

 बॉलिवू़ड अभिनेता सलमान खान सध्या आयफा अवॉर्ड् शोचं होस्टींग केल्याने चांगलाच चर्चेत आहे.

Updated: Jun 5, 2022, 02:55 PM IST
भाईजान, सल्लू, दबंग खान नंतर सलमान 'या' नवीन नावाने ओळखला जाणार  title=

मुंबई : बॉलिवू़ड अभिनेता सलमान खान सध्या आयफा अवॉर्ड् शोचं होस्टींग केल्याने चांगलाच चर्चेत आहे. मात्र सलमान खान चर्चेत येण्यामागचं आणखीण एक कारण समोर आले आहे. सलमान खानला एका बॉलिवूडमधल्याच  स्टार अभिनेत्री 'अंकल' म्हटलेय.त्यामुळे आता सलमान खानला  'अंकल' म्हणणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण असा  प्रश्न उपस्थित होत आहे.     

नुकताच आयफा अवॉर्ड्स पार पडला, ज्यामध्ये अनेक दिग्गज स्टार्सनी हजेरी लावली होती.या शोचे होस्टींग सलमान खान करत होता.सलमान खानने रात्रभर लोकांचे मनोरंजन केले. या शो दरम्यान एक अभिनेत्री थेट अंकलच बोलून गेली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सारा अली खान आहे,  

शो दरम्यान अभिनेत्री सारा अली खान देखील स्टेजवर पोहोचली आणि यावेळी तिने सलमानला भाऊ म्हणून हाक मारली. ज्यावर अभिनेत्याने तिला आठवण करून दिली की तो तिच्या पालकांच्या बरोबरीचा आहे. यावर ती त्याला 'अंकल' म्हणते, तर सलमान म्हणतो की आता ती कधीच त्याची हिरोईन होऊ शकत नाही. त्यानंतर सारा त्याला सलमान बॉस म्हणते, ज्यावर सलमान म्हणतो की आता त्याच्यासोबतचा चित्रपट पक्का असे कमेंटच तो देऊन टाकतो. 

सारा अली खान लवकरच विकी कौशलसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. विकीने लग्नानंतर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. लक्ष्मण उत्रेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.