अबॉर्शन आणि आत्महत्येच्या रंगणाऱ्या चर्चांवर इलियाना म्हणाली...

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री इलियाना डीक्रूझ चर्चेत आहे. 

Updated: May 2, 2021, 01:48 PM IST
अबॉर्शन आणि आत्महत्येच्या रंगणाऱ्या चर्चांवर इलियाना म्हणाली... title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री इलियाना डीक्रूझ चर्चेत आहे. कधी चित्रपटामुळे तर कधी व्हायरल होत असलेल्या फोटोंमुळे. इलियाना कायम तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टी उघडपणे सांगते. इलियाना लहानपणी बॉडी शोमिंगला कशी बळी पडली? हा अनुभव देखील इलियानाने शेअर केला. सांगायचं झालं तर सेलिब्रिंटीच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक अफवा पसरत असतात. इलियानासोबत देखील असचं झालं आहे.

मध्यंतरी इलियाना गरोदर असल्याची चर्चा रंगली होती. शिवाय तिने अबॉर्शन देखील केलं आहे, आणि अत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. पण यासर्व चर्चांना आता खुद्द इलियानाने पूर्णविराम दिला आहे. तिने सर्व चर्चांचं खंडन केलं आहे. 

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत, तुझ्याबद्दल अनेक अफवा पसरत आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर इलियाना म्हणाली, 'अशा काही बातम्या होत्या, त्यामध्ये मी गरोदर होती, तर काही बातम्यांमध्ये अबॉर्शन केलं असल्याचं देखील सांगण्यात आलं. या सगळ्या बातम्या ऐकून मला फार वाईट वाटलं. '

इलियाना पुढे म्हणाली, 'लोक असा विचार करतात. याचं मला फार वाईच वाटतं. तर दुसरीकडे आत्महत्या केली असल्याचं देखील कानावर येत होतं. माझ्या कामवालीने याबद्दल माहिती दिली अशी चर्चा देखील पसरली होती.. ' आत्महत्येबद्दल देखील इलियानाने खुलासा केला. 

ती म्हणाली, 'मी कधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या घरी कामवाली नाही. मी आनंदी आणि जिवंत आहे. मला कळत नाही लोकांना हा सगळा मसाला मिळतो कसा...' दरम्यान 2018 साली इलियाना तिच्या बॉयफ्रेंडच्या बाळाला जन्म देणार असल्याची चर्चा रंगली होती. पण इलियाने गरोदर नसल्याचं सांगितलं.