एका मुलाच्या आईला डेट करतोय इम्तियाज अली...

 दिग्दर्शक, लेखक इम्तियाज अली आजकाल स्वतःच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे.

Updated: May 2, 2018, 12:16 PM IST
एका मुलाच्या आईला डेट करतोय इम्तियाज अली... title=

मुंबई : रुपेरी पडद्यावर लव्ह स्टोरीज अत्यंत सुंदररीत्या दाखवणारे दिग्दर्शक, लेखक इम्तियाज अली आजकाल स्वतःच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. सध्या एका मुलीला डेट करत आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. मात्र खूप कमी लोकांना तिच्याबद्दल माहित आहे. कोण आहे ती?

कोणासोबत करतोय इम्तियाज डेट?

इम्तियाज अली आपल्या पर्सनल लाईफबद्दल फार कमी बोलतो. मात्र सध्या तो सेलिब्रेटी शेफ सारा टोडला डेट करत आहे. सारा मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया सीजन-६ ची स्पर्धक होती. आता ती एका रेस्टॉरंटची मालकीन असण्याबरोबर CookBook ची लेखिका आहे. खूप काळापासून ती भारतात राहत आहे. गोव्यात तिचे 250-seat नावाचे ऑस्ट्रेलियन थीम रेस्टॉरंट आहे. इम्तियाजला डेट करण्यापूर्वी तिचे  Devinder Garcha नावाच्या व्यक्तीसोबत विवाह झाला होता. या दोघांना १० वर्षांचा मुलगा आहे. मात्र त्यांचे नाते आता संपुष्टात आले आहे.

 

We’ve arrived in the stunning #Townsville...bring on endless amount of swimming, good food and a relaxing weekend.

A post shared by SARAH TODD (@sarahtodd) on

अशी झाली डेटिंगला सुरुवात

१८ वर्षांची असताना पासून साराने काम करायला सुरुवात केली. खाण्याची आवड असल्याने तिने जगभरात भ्रमंती केली. त्यासाठीच ती भारतातही आली. तेव्हा तिची भेट इम्तियाज अली सोबत झाली आणि मग डेटिंगला सुरुवात झाली.

मात्र दोघांकडून दुजोरा नाही

अलिकडेच साराने सोशल मीडियावर आपल्या नव्या रेस्टॉरंट आणि बीच क्लबचे फोटोज पोस्ट केले आहेत. या फोटोत इम्तियाज अली देखील आहे. मात्र दोघांनीही नात्याबद्दल औपचारीरित्या काही सांगितलेले नाही.