ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये नव्या नवेली आणि सिद्धांत चतुर्वेदीचा ब्रेकअप!

Navya Naveli Nanda Break Up With Siddhant Chaturvedi : ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये नव्या नवेली नंदाचा झाला ब्रेकअप! 

दिक्षा पाटील | Updated: Aug 3, 2024, 02:30 PM IST
ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये नव्या नवेली आणि सिद्धांत चतुर्वेदीचा ब्रेकअप!  title=
(Photo Credit : Social Media)

Navya Naveli Nanda Break Up With Siddhant Chaturvedi : बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्यात सगळ्यात जास्त चर्चा होती ती म्हणजे अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्याच्या नात्याची. ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते अशा चर्चा चांगल्या रंगल्या होत्या. अनेकदा त्या दोघांना एकत्र कुठे ना कुठे स्पॉट करण्यात आलं आहे. खरंतर त्या दोघांच्या अफेअरची चर्चा तेव्हा रंगली जेव्हा ते दोघं सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी ऋषिकेशला गेले होते आणि तिथून त्यांनी शेअर केलेले फोटो चर्चेत आले होते. एकदा तर ते दोघं दिवाळी पार्टीमध्ये एकत्र कारमध्ये दिसले. पण अशी चर्चा आहे की ते विभक्त झाले आहेत. त्यांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात आहे. 

नव्या नवेली नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी कधी पार्टीमध्ये तर कधी घरी दिसतो. एकदा तो श्वेता नंदाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सहभागी झाला होता. एकदा त्या दोघांना विमानतळावर देखील स्पॉट करण्यात आलं होतं. मात्र, त्या दोघांनी कधीच त्यांच्या नात्याविषयी मोकळेपणानं काही सांगितलं नाही. पण आता लेटेस्ट रिपोर्टमध्ये त्यांच्या ब्रेकअपची माहिती येत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'बॉलीवुड हंगामा' च्या रिपोर्टनुसार, नव्या आणि सिद्धांत अधिकृतपणे विभक्त झाले आहे. पण तिचं नातं चांगलं होतं. त्यासाठी ब्रेकअपनंतर देखील ते खूप चांगले मित्र राहणार आहेत. मीडियावर त्या दोघांमध्ये आलेला दुरावा हा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. कारण दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांच्या पोस्टला लाइक करायचे. रेड हार्ट ड्रॉप करायचे. पण असं झालं नाही. 

हेही वाचा : 'मी मेलो नाही...', एकामागे एक फ्लॉप चित्रपट देण्यावर अक्षय कुमारची खोचक प्रतिक्रिया

नव्या नवेदी नंदा सध्या तिच्या इन्स्टाग्रामवर सतत तिच्या पाळीव श्वानासोबतचे फोटो शेअर करताना दिसते. अशात सगळे म्हणत आहेत की आनंदी राहण्यासाठी तिनं दुसऱ्या गोष्टींचा शोध घेतला आहे. तर सिद्धांतच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो सगळ्यात शेवटी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'हम कहां' मध्ये दिसली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे आणि आदर्श गौरव यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. सध्या त्याच्याकडे कोणता दुसरा प्रोजेक्ट नाही.