NIA मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटरची नोकरी आणि 92 हजार पगार, सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका!

NIA Recruitment 2024: नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) मध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते.

Pravin Dabholkar | Updated: Dec 16, 2024, 04:24 PM IST
NIA मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटरची नोकरी आणि 92 हजार पगार, सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका! title=
एनआयएमध्ये नोकरी

NIA Recruitment 2024: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) मध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते. या भरती दरमयान कोणत्याही लेखी परीक्षेची गरज नाही. तसेच निवड झाल्यास उमेदवाराला 92 हजारपर्यंत पगार मिळू शकतो. एनआयएने यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

NIA मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) च्या एकूण 33 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. NIA च्या या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराकडे डेटा एन्ट्रीच्या कामाचा अनुभव असावा. त्याला टायपिंगचे चांगले ज्ञान असावे. 
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

किती मिळेल पगार?

NIA च्या या पदांसाठी निवडला झालेल्या उमेदवारांना 29 हजार 200 ते 92 हजार 300 रुपये पगार दिला जाईल. स्तर-5 नुसार हा पगार असेल. यात ग्रेड पे ₹ 2,800 रुपये दिले जातील. तसेच डीए, एचआरए, टीपीटी आणि इतर भत्ते केंद्र सरकारच्या नियमानुसार दिले जातील.एनआयए डेटा एन्ट्री ऑपरेटर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी NIA च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा. यानंतर, भरलेला फॉर्म आणि संबंधित कागदपत्रे एका लिफाफ्यात बंद करून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावी लागतील. उमेदवारांनी आपला अर्ज एसपी (प्रशासन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली - 110003 या पत्त्यावर पाठवा. 

कधीपर्यंत पाठवाल अर्ज?

इच्छुक आणि पात्र उमेदवार  NIA च्या अधिकृत वेबसाइट nia.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. आपला अर्ज 8 फेब्रुवारी 2025 पर्यंत पाठवू शकतात.  या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या. 

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये अकाउंटंटसह विविध पदांची भरती

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन भरती अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, अकाऊंटंट, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि अधीक्षकांसह अनेक पदे भरली जाणार आहेत. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सामान्य) ची 40 पदे, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) ची 13 पदे, अकाऊंटंटची 9 पदे,अधीक्षक (जी) ची 22 पदे, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक 81 पदे, अधीक्षक (जी) ची 2 पदे,कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – SRD (NE) ची 10 पदे, आणिकनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – SRD (केंद्रशासित प्रदेश लडाख) ची 2 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट cewacor.nic.in वर जा.'करिअर' विभागात क्लिक करा आणि नोंदणी करा.अर्जात योग्य तपशील भरा. फोटो, सही आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा. आता फॉर्मची प्रिंटआउट घ्या. इच्छुक उमेदवार 14 डिसेंबर 2024 ते 12 जानेवारी 2025 या कालावधीत विविध पदांसाठी अर्ज भरू शकतात. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या.