bigg boss ott : राकेश बापटवर का भडकला करण जोहर?

बिग बॉस ओटीटी संडे का वार मध्ये राकेश बापट, शमिता शेट्टी सोबत, करण जोहर त्यांच्या बदलत्या वागण्यावर आणि स्त्रियांबद्दलच्या कमेंटबद्दल चांगलाच क्लास घेतो. 

Updated: Sep 13, 2021, 10:55 AM IST
bigg boss ott : राकेश बापटवर का भडकला करण जोहर?

मुंबई : बिग बॉस ओटीटी संडे का वार मध्ये राकेश बापट, शमिता शेट्टी सोबत, करण जोहर त्यांच्या बदलत्या वागण्यावर आणि स्त्रियांबद्दलच्या कमेंटबद्दल चांगलाच क्लास घेतो. राकेशने एका टास्क दरम्यान कमेंट केली होती की, पुरुष स्त्रियांपेक्षा बलवान आहेत. राकेशच्या या विधानावर करणने त्याला सुनावलं आणि म्हटले की, तुमच्या विधानाचा अर्थ असा की तुम्ही महिलांना कमकुवत समजता.

करण म्हणाला, 'तुम्ही अशी टिप्पणी करू नये. आम्ही अशा काळात जगत आहोत जिथे कोणीही कोणापेक्षा कमी नाही. ' मी एका घरात वाढलो जिथे स्त्रिया राहत होत्या.यावर मूसने करणचे समर्थन केले आणि सांगितले की मी राकेशला सांगितले होते की ताकद लिंगावरुन ठरत नाही. मात्र, शमिताने राकेशला पाठिंबा दिला आणि सांगितले की, राकेशचा तो अर्थ नव्हता. तो अशा प्रकारे बोलला की लोकांचा गैरसमज होतो.
करणने शेवटी असेही म्हटले की राकेशला समजवणे केवळ कठीणच नाही तर अशक्य आहे.

शमिता काय म्हणाली
करणने शमिताला विचारले की राकेशने तिचे हृदय मोडले आहे का, ती म्हणते, 'राकेशला वाटते की त्याला मला दुखवायचे नाही आणि माझ्यापासून दूर राहायचे आहे, तर तो चुकीचे करत आहे.'

दिव्या अग्रवालमुळे शमिता- राकेशमध्ये दुरावा?
राकेश आणि शमिता शोच्या सुरुवातीपासून अगदी जवळ आहेत. दोघांमधील बंध खूप मजबूत आणि घट्ट होत होता. चाहत्यांनाही दोघांची केमिस्ट्री आवडत होती, पण नंतर अचानक दोघांमध्ये दुरावा सुरू झाला आणि मग दोघांमध्ये भांडण वाढत आहे. कुठेतरी याचे कारण दिव्याला सांगितले जात आहे.