राज कुंद्रावर जबरदस्तीचे आरोप करणाऱ्या मॉडेलची आज चौकशी

शर्लिन चोप्राचा दावा आहे की राज कुंद्रा दोन वर्षांपूर्वी 2019  मध्ये अचानक तिच्या घरी आला 

Updated: Aug 6, 2021, 08:11 AM IST
 राज कुंद्रावर जबरदस्तीचे आरोप करणाऱ्या मॉडेलची आज चौकशी

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक करण्यात आल्यानंतर अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने त्याच्यावर खळबळजनक आरोप केले  आहेत.शर्लिन चोप्राने पोलिसांना दिलेल्या निवेदनात राज कुंद्रावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे.शर्लिन चोप्राचा दावा आहे की राज कुंद्रा दोन वर्षांपूर्वी 2019  मध्ये अचानक तिच्या घरी आला आणि तिच्याशी लैंगिक गैरवर्तन केले.

शर्लिनने आरोप केला की, राज कुंद्राने तिला जबरदस्तीने किस केले. राज कुंद्राचं हे वागणं  पाहून घाबरल्याचं ही तिनं सांगितलं आहे.

शर्लिन चोप्राची आज चौकशी

आता बातमी समोर आली आहे की, आज मुंबई पोलीस क्राईम ब्रॅन्चकडून शर्लिन चोप्राला समन्स पाठवण्यात आलं आहे. राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिनची  चौकशी होणार आहे. 

 मुंबई पोलीस क्राईम ब्रॅन्चने अभिनेत्री शर्लिन चोप्राला समन्स बजावले आहे की तिला पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणी अटक करण्यात आलेल्या उद्योगपती राज कुंद्रा  प्रकरणात आज चौकशीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

राज कुंद्राबाबत शर्लिन आणखी कोणती माहिती देणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.