मुंबई : बॉलिवूडमध्ये आतापर्यंत एम. एस. धोनी, कपिल देव यांसारख्या भारतीय क्रिकेटपटूंच्या जीवनावर आधारित सिनेमा तयार करण्यात आले आहेत. या दिग्गज क्रिकेटपटूंच्या बायोपिकनंतर आता आणखी एका इंडियन क्रिकेटरचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चर्चा आहे की, भारतीय क्रिकेटसंघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू सौरभ गांगुलीचा बायोपिक बनवण्यात येणार आहे.
आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुलीच्या जीवनावर आधारित सिनेमा येणार म्हटल्यावर ही भूमिका कोण साकारणार यावरुन देखील चर्चा सुरु झाली आहे. अभिनेता रणबीर कपूरच्या नाव या भूमिकेसाठी पुढे आलं आहे. रणबीर सौरभ गांगुलीची बायोपिकमध्ये काम करणार असल्याचं समोर आलंय. खुद्द सौरभ गांगुली यांनी एका मुलाखतीत आपला बायोपिक बनत असल्याचं म्हटलंय. सोबतच अभिनेत्यांच्या नावावरुन होत असलेल्या चर्चांवर देखील उत्तर दिलं आहेत.
सौरभ गांगुली म्हणाले, होय, "मी बायोपिक बनवण्यासाठी सहमती दिली आहे. हा सिनेमा हिंदी भाषेत बनणार आहे. पण लगेचच दिग्दर्शकाच्या नावाचा खुलासा करता येणार नाही. सगळ्या गोष्टी पुर्ण होण्यासाठी अद्याप वेळ लागेल."
यावेळी बायोपिकबाबत अभिनेत्री नेहा धुपियाने देखील आपलं मत व्यक्त केलं. नेहा म्हणाली, अभिनेता हृतिक रोशन देखील तुमच्या भूमिकेसाठी योग्य चेहरा ठरु शकतो. यावर सौरभ गांगुलीने मात्र हृतिकच्या नावाला नकार दिला.
सौरभ गांगुली म्हणाले, "हृतिकला आधी माझ्यासारखी बॉडी बनवावी लागेल. लोक म्हणतील, की हृतिकची बॉडी कशी आहे आणि माझी बॉडी कशी आहे. हृतिक किती चांगला दिसतो, त्याची बॉडी देखील जबरदस्त आहे."
सौरभ गांगुर्लीची ही बायोपिक बिग बजेट फिल्म असणार आहे. या सिनेमासाठी 200 ते 250 कोटींचा बजेट ठरवला जाण्याची शक्यता आहे.
याआधी एम.एस. धोनीच्या बायोपिकमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने काम केलं होतं. तर भारतीय क्रिकेटसंघाचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या बायोपिकमध्ये इमरान हाश्मी झळकला होता. तर मास्टर बास्टर सचिन तेंडूलकरवर देखील डॉक्यूमेंट्री फिल्म बनली होती