राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत वाढ; मीडियाला पाहून हात जोडले

पॉर्न केस प्रकरणात राज कुंद्राच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे.

Updated: Jul 24, 2021, 07:39 AM IST
राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत वाढ; मीडियाला पाहून हात जोडले

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पती राज कुंद्रा याला सॉफ्ट पॉनोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. शुक्रवारी 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्राची चौकशी करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचने 7 दिवस मागितले आहेत. दरम्यान या सर्व प्रकरणामध्ये राज कुंद्राचा एक व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. 

भायखळा जेलमधून हाय कोर्टासाठी निघत असताना राज कुंद्राला कॅमेरात कैद करण्यासाठी पापाराझींनी घेरलं होतं. यावेळी पोलिसांनी राजला गाडीत बसवलं असता राज कुंद्रा याने मीडियाला पाहून हात हलवला. वेव केल्यानंतर मीडियाला त्याने हात जोडून ग्रीटही केलं. यावेळी राजच्या चेहऱ्यावर निराशा झळकत होती.

राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म बनवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात अनेक महत्त्वाचे खुलासे होत असल्याने याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी क्राईम ब्रांचकडून करण्यात आली. ही मागणी कोर्टाने मान्य केली आहे.

पॉर्न फिल्मद्वारे मिळवलेले पैसे ऑनलाईन सट्टेबाजीसाठी वापरले जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान असा आरोप मुंबई पोलिसांनी कोर्टाला केला आहे. यामुळे राज कुंद्राच्या बँक खात्यांची चौकशी झाली पाहिजे, असंही म्हटलं आहे.

Shilpa Shetty पण आहे कंपनीची डिरेक्टर 

 

राज कुंद्राची कंपनी विआन इंडस्ट्रीजचं रजिस्ट्रेशन Retail Trade, Except Of Motor Vehicles And Motorcycles, Repair Of Personal And Household Goods म्हणून करण्यात आलं आहे. विआन इंडस्ट्रीज लिमिटेडटे एकूण 10 एक्टिव्ह डायरेक्टर आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचं देखील नाव आहे.