'विरानुष्का'च्या लग्नाचा फोटो रचणार नवा विक्रम ?

काल इटलीमध्ये चाहते आणि मीडियापासून दूर 'विरानुष्का' लग्नबंधनात अडकले.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 12, 2017, 09:46 PM IST
'विरानुष्का'च्या लग्नाचा फोटो रचणार नवा विक्रम ?  title=

मुंबई : काल इटलीमध्ये चाहते आणि मीडियापासून दूर 'विरानुष्का' लग्नबंधनात अडकले.

काही दिवसांपूर्वी अनुष्काला सहकुटुंब मुंबई विमानतळावर पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या लग्नाचा अंदाज वर्तवला होता. मात्र त्याबाबत कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नव्हती 

मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न 

विराट आणि अनुष्का केवळ ४४ लोकांच्या उपस्थितीमध्ये विवाहबंधनात अडकले. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. 

 

 

 

इंस्टाग्रामवर चर्चा 

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले.  विराटच्या फोटोला १९ तासामध्ये ३५ लाख १० हजाराहून अधिक लाईक्स मिळाले. तर अनुष्काच्या फोटोला २६ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. जर पुढच्या पंधरा दिवसात दोघांच्या फोटोला दुप्पट लाईक्स मिळाले तर त्यांचे फोटो  २०१७ सालातील सर्वाधिक लाईक्स मिळावलेला फोटो ठरेल.  

कोणते सेलिब्रिटी टॉप लिस्टमध्ये आहेत ?

सेलेना गोम्स ही अमेरिकन पॉप गायिका या यादीमध्ये आहे. २५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने फोटो अपलोड केले होते. त्यावेळेस सर्वाधिक लाईक्सच्या यादीमध्ये सेलेना १० व्या क्रमाकांवर होती.