ईशा अंबानीनं कोणाची लग्नगाठ बांधत वेधलं लक्ष?

ही व्यक्ती आहे तरी कोण.. 

Updated: Oct 21, 2021, 10:23 AM IST
ईशा अंबानीनं कोणाची लग्नगाठ बांधत वेधलं लक्ष?
छाया सौजन्य- सोशल मीडिया / Taj Lands End, Mumbai Instagram)

मुंबई : देश आणि जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नाव येणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या राहणीमानाबाबत कायमच कुतूहल पाहायला मिळतं. त्यातही अंबानी यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्या बरोबरीनं काम पाहणारी त्यांची लेक ईशा, सर्वांच्याच नजरा वळवते. ईशा कायमच विविध कार्यक्रमांना हजेरी लावते, अनेक ठिकाणी ती अंबानी उद्योगसमूहाचं प्रतिनिधीत्त्वं करताना दिसते. 

अशी ही ईशा सध्या तिच्या काही फोटोंमुळं चर्चेत आली आहे. हे फोटो आहेत एका विवाहसोहळ्यातील. जिथं इशा वधु- वराची लग्नगाठ बांधताना दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये ईशाच्या कुटुंबातील व्यक्तीही दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे फोटो पाहता ती नेमकी कोणाच्या विवाहसोहळ्याला गेली होती, असाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. तर, या प्रश्नाचं उत्तर येत आहे थेट 2019 या वर्षातून. जेव्हा ईशानं तिचा बालमित्र धीर मोमाया याच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. 

हीर हा एक निर्माता असून, मुंबईतील नावाजलेलं व्यक्तिमत्त्वं छाया मोमाया यांचा मुलगा आहे. धीरनं युक्रेनमधील फिल्ममेकर दरिया गायकालोवा हिच्याशी विवाहबंधनात अडकत नवा प्रवास सुरु केला होता, त्याचवेळी अंबानी कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. 

मित्राच्या लग्नसोहळ्यासाठी ईशानं निवडलेला लूक सर्वांच्याच नजरा वळवून गेला. कोणा एका अभिनेत्रीलाही लाजवेल असंच ईशाचं सौंदर्य या लूकमध्ये खुलून आलं होतं. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसल यांनी ईशाचा लूक डिझाईन केला होता. अतिशय कमी मेकअप आणि सोबर लूक देत ईशाचं सौंदर्य त्यांनी आणखी खुलवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही ठरला होता.