close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ईशा गुप्ता आणि अली फजलचा रॅम्पवॉक...

प्रसिद्ध ब्रॅंड मार्क अंड स्पेंसर्स स्प्रिंग समर १८ कलेक्शनच्या फॅशन शो मध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता आणि अली फजल यांनी रॅम्पवॉक केला. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 10, 2018, 11:17 PM IST
ईशा गुप्ता आणि अली फजलचा रॅम्पवॉक...

मुंबई : प्रसिद्ध ब्रॅंड मार्क अंड स्पेंसर्स स्प्रिंग समर १८ कलेक्शनच्या फॅशन शो मध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता आणि अली फजल यांनी रॅम्पवॉक केला. 

मजेशीर अंदाज

रॅपवर अली आणि ईशा काहीशा मजेशीर अंदाजात दिसले. अलीकडेच ईशाने केलेल्या खुलासा केला होता की ती एक इराणी चित्रपट करत आहे. त्याचबरोबर ईशा पलटन या चित्रपटात काम करत आहे. यात ती तब्बल ६ वर्षांनी अर्जुन रामपालसोबत दिसणार आहे.

 '3 इडियट्स' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

अली फजल याने २००९ मध्ये आलेल्या '3 इडियट्स' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात त्याने जॉली लोबोची व्यक्तिरेखा साकारली होती. जो कंटाळून आत्महत्या करतो. अली फजल लवकरच वेब सीरीजच्या मिर्जापूर मध्ये झळकेल. या वेब सिरीजचे काही शूटिंग त्याने पूर्ण केले आहे.