व्हिडिओ : जान्हवी कपूरचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ : जान्हवी कपूरचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल  title=

मुंबई : बॉलिवूडच्या सुपरस्टार श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर सध्या 'धडक' या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच जान्हवी आणि ईशानचा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्या अगोदर जान्हवी आणि ईशानमध्ये खूप चांगली मैत्री झाली आहे.  हे दोघं एकमेकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाच आहे. पण आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये जान्हवीचा खास अंदाज पाहायला मिळत आहे. 

जान्हवी आणि ईशान सध्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याबरोबरच ते देशातील अनेक शहरांमध्ये फिरत आहेत. तेव्हाचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जान्हवी एअरपोर्टच्या पिझ्झा शॉपमध्ये ऑर्डर देताना दिसत आहे. पिझ्झाची ऑर्डर देताना ती अनेक व्हरायटी विचारत आहे. जान्हवीच्या शेजारी ईशान उभा असून तो तिचा व्हिडिओ करत आहे. सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

What happens after a hectic day of promotions + a flight delay - a very enthusiastic @janhvikapoor & @ishaan95 ordering pizza just like all of us! #Dhadak . . . . . #janhvi #janhvikapoor #ishaan #ishaankhatter #lucknow #promotions #pizza #pizzatime #pizza

A post shared by Dharma Productions (@dharmamovies) on

हा व्हिडिओ धर्मा प्रोडक्शनच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, प्रमोशनच्या हेक्टिक शेड्यूल आणि फ्लाइट लेटच्या दरम्यान काय होतं हे पाहा.

सैराटचा रिमेक असलेला हा धडक सिनेमा 20 जुलै रोजी पडद्यावर दिसणार आहे. शशांक खेतान या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून हा सिनेमा करण जोहर बॅनरचा आहे.