आता फिटनेससाठी ही अभिनेत्रीही करणार पोल डान्स...

फिटनेससाठी करणार पोल डान्स...

Updated: Jul 3, 2018, 01:26 PM IST
आता फिटनेससाठी ही अभिनेत्रीही करणार पोल डान्स... title=

मुंबई : साजिद नाडियाडवाला यांच्या हाऊसफुल्ल ४ साईन केल्यानंतर अभिनेत्री कृती खरबंदा आता फिटनेससाठी पोल डान्स करणार आहे. कृतीचा यमला पगला दिवाना फिर से हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पण हाऊसफुल्ल या विनोदी सिनेमातील भूमिकेत कृतीला फिट राहायचे आहे आणि त्यासाठी तिने विशेष डाएटही सुरु केले आहे. त्याचबरोबर पोल डान्स शिवाय बॉलिवूड आणि कंटम्परेरी डान्सचे ट्रेनिंग घेण्यासही सुरुवात केली आहे.

कृती म्हणते...

कृतीने सांगितले की, पोल डान्स फिटनेस आणि नृत्य क्षमता वाढवण्याचा एक उत्तम उपाय आहे. यापूर्वी मी हे कधीही केलेले नाही आणि याचा आनंद घेत आहे. 

कृतीचा प्रवास

कृती खरबंदा आपल्या फिटनेसबद्दल अतिशय जागरुक आहे. 'शादी में जरूर आना' सिनेमात तिचा फिटनेस अगदी स्पष्ट दिसून येतो. या सिनेमात ती राजकुमार रावसोबत झळकली होती. मात्र तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करु शकला नाही. कृती खरबंदाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली होती. त्यानंतर तेलगू सिनेमा बोनी मधून तिच्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात झाली. २०१६ मध्ये आलेला राज रिबूट हा कृतीचा पहिला सिनेमा होता. यानंतर ती परेश रावलसोबत गेस्ट इन लंडनमध्ये दिसली.