IT Raid : अनुराग कश्यप, तापसी पन्नूनंतर आणखी एक मोठं नाव समोर

याप्रकरणी अनेक महत्त्वाचे खुलासे होत आहेत.   

Updated: Mar 5, 2021, 04:09 PM IST
IT Raid : अनुराग कश्यप, तापसी पन्नूनंतर आणखी एक मोठं नाव समोर title=

 मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यप(Anurag Kashyap) आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. गुरूवारी देखील रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. याप्रकरणी अनेक मोठे खुलासे समोर आले आहेत. आता या प्रकरणात क्वान टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीतील एका मोठ्या व्यक्तीचे नाव समोर आले आहे. क्वान कंपनीमधील अफझर जैदीचं नाव समोर आलं आहे. याप्रकरणात एका पाठोपाठ अनेकांची नाव  समोर येत आहेत. 
 
दोन दिवसांच्या या छापेमारीत 650 करोड रुपयांच्या (IT Dept claims Rs 650 cr discrepancies) आर्थिक अनियमिततेची माहिती मिळाली आहे. त्यानंतर आयकर विभागाकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, तापसी पन्नूच्या ४  ठिकाणी चौकशी करण्यात आली आहे. 

तापसीच्या दिल्लीमधील घरी देखील आयकर विभागाने धाड टाकली आहे. महत्त्वाचं म्हणजे छापेमारी दरम्यान ७ लॉकर्सबद्दल देखील माहिती मिळाली आहे.  हे सातही लॉकर्स आयकर विभागाने  सीज केलं आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2  टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्या, 2 प्रॉडक्शन हाऊस, एका अभिनेत्रीची चौकशी करण्यात आली आहे. 

महत्वाची बाब म्हणजे ही छापेमारी मुंबई, पुणे आणि हैद्राबाद अशी 30 ठिकाणी करण्यात आली. यामध्ये कलाकार, प्रतिभा प्रबंधन कंपनी केडब्ल्यूएएन आणि ऍक्सीडच्या काही अधिकाऱ्यांच्या समावेश होता.